‘सुख कळले’ ला आदर्शवततेची किनार…

उषा परब :डॉ. दीपाली काजरेकर यांच्या ‘सुख कळले’ कथा संग्रहाचे प्रकाशन..

कुडाळ : सासू-सूनेच्या बदनाम झालेल्या नात्याला ‘सुख कळले’ या कथा संग्रहातून आदर्शवतेची किनार दिलेली आहे. ‘सुख कळले’ची लोकप्रियता पारंपरिक आहे, कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांनी कोमसापच्या आयोजित कार्यक्रमात केले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळ सिंधुदुर्गच्या सहकार्याने येथील ज्येष्ठ साहित्यिका लेखिका डॉ दिपाली चंद्रकांत काजरेकर लिखित ‘सुख कळले’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत येथील संत राऊत महाराज कॉलेजच्या सभागृहात झाले. यावेळी उषा परब बोलत होत्या.
प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका कोंकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखा अध्यक्ष सौ वृंदा कांबळी, सामाजिक कार्यकर्ते धीरज परब, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ ए. एन लोखंडे, वर्ल्ड रेकॉर्ड व गिनीज रेकॉर्ड होल्डर चंद्रकांत काजरेकर ,लेखिका डॉ दिपाली  काजरेकर, कोमसाप सचिव सुरेश पवार ,प्रा डॉ शरयू आसोलकर ,सुनील मराठे, प्रदीप केळुसकर ,प्रा अरुण मर्गज ,प्रा संतोष वालावलकर, प्रा एस टी आवटी, कमलाकर चव्हाण, गोविंद पवार, स्मिता नाबर ,प्रगती पाताडे, सुस्मिता राणे ,राजेंद्र गोसावी श्री तुळसकर साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी वर्ग आदी उपस्थित होते
  यावेळी बोलताना श्रीमती परब म्हणाल्या, जिद्द चिकाटी मेहनत व आत्मविश्वासाच्या  जोरावर माणसाने एखादी  गोष्ट करायचे ठरवले तर ती सहज करू शकते  याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लेखिका डॉ दिपाली काजरेकर आहेत, त्यांचा एकूणच प्रवास लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून त्या निश्चितच आहेत. .लेखिकाने ज्ञानार्जन व  ज्ञानदान या दोन्ही गोष्टी एकाच वेळी केलेल्या आहेत हे विशेष आहे. त्यांच्या चंद्रदीप कवितासंग्रहानंतर त्यांनी  सुख कळले या कथा संग्रहाकडे केलेली वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे सुख कळले कथासंग्रह ही कथा स्त्रीवादी आहे. कथेत स्त्री प्रमुख असून स्त्रिया भोवती गुंतलेली आहे. विषय पारंपरिक आहेत या कथांमध्ये सहा सात कथा ह्या नोकरी करणाऱ्यां स्त्रियांच्या आहेत. त्यांनी कवितासंग्रहानंतर वर्षभरातच कथासंग्रहाकडे केलेली वाटचाल लक्षात घेता, भविष्यातही साहित्यक्षेत्रात यशस्वी झेप घ्यावी यासाठी कोमसापचे निश्चितच सहकार्य लाभेल असे सांगितले.
यावेळी बोलताना लेखिका डॉ. दीपाली काजरेकर म्हणाल्या, माझा पहिला चंद्रदीप काव्यसंग्रह त्यानंतर आजचा सुख कळले कथा संग्रहासाठी  पद्मश्री मधुभाईं कर्णिक यांची नेहमीच प्रेरणा त्यांचे आशीर्वाद मिळाले त्यामुळेच मी साहित्य क्षेत्राकडे वाटचाल केली आज समाजात वावरताना समाजाचे निरीक्षण केले तर व्यवस्था अजिबात बदललेली नाही समाजात वावरताना स्त्री पुरुष जे चित्र आहे ते अजूनही बदलले नाही स्त्रियांना पुरुष प्रधान संस्कृतीत दुय्यम स्थान दिले गेले आहे हेच चित्र या सुख कळले तून उभे केले आहे असे सांगत  स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करताना नीतिमत्ता महत्त्वाची असल्याचे डॉ काजरेकर यांनी सांगितले 
धीरज परब यांनी सुख कळलेतून समाजात असणारे वास्तव उलगडण्याचा प्रयत्न लेखिका डॉ काजरेकर यांनी केला आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे फार मोठे कार्य असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ लोखंडे यांनीसुद्धा या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा डॉ दिपाली काजरेकर यांच्या वतीने  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण मर्गज यांनी केले. प्रास्ताविक कोमसाप सचिव सुरेश पवार यांनी केले, तर आभार प्रा संतोष वालावलकर यांनी मानले.

You cannot copy content of this page