ग्रा.प. सदस्य प्रशांत बांदेकर स्वतः उतरले नाल्यात, केली साफसफाई…

आक्रमक भूमिका घेत ठिय्या मांडला: तात्पर भूमिकेबाबत ग्रामस्थांकडून कौतुक..

बांदा/प्रतिनिधी
गटारांची व नाल्यांची साफसफाई नसल्याने पावसाने पाणी तुंबून दरवेळी मोठ्या पावसात बांदा वाफोली रस्ता वाहतुकीसाठी बंद राहतो. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर धुरी यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. याची दखल घेत प्रभाग क्रमांक तीनचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी स्वतः नाल्यातील गुडगाभर पाण्यात उतरत नालेसफाई केली. नाल्यात साचून राहिलेला कचरा काढण्यात आला.
बांदा वाफोली रस्त्यावर मुसळधार पाऊस पडल्यानंतर तात्काळ नाला पूर्णपणे भरून पाणी रस्त्यावर येते. परिणामी या मार्गावरील वाहतूक
वेळोवेळी बंद होते. पाऊस ओसरल्यावर देखील पाणी काही रस्त्यावरून कमी होत नव्हते. नाल्यात कचरा मोठ्या प्रमाणात अडकल्याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नव्हता.
येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर धुरी रस्त्यावरच ठिय्या करत जोपर्यत ग्रामपंचायत सदस्य याठीकाणी येऊन तोडगा काढत नाहीत तोपर्यंत वाहतूक सोडणार नसल्याची भूमिका घेतली. याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर व रत्नाकर आगलावे हे तात्काळ पोहचले. पाऊस ओसरला तरी नाल्यातील पाणी रस्त्यावर गुडघाभर साचून राहीले होते. सदस्यांनी जवळच हायवेचे काम चालू होते तेथील कामगारांना मदतीसाठी बोलावले. कामगार आले पण नाल्यात पाणी जास्त असल्याने कोणीच नाल्यात उतरण्यास धजावत नव्हता. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री बांदेकर यांनी स्वतः नाल्यात उतरण्याचा निर्णय घेतला. गुडगाभर पाण्यात उतरून त्यांनी नाले सफाई करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना शामू धुरी यांनी देखील मदत केली. नाल्यात साचून राहीलेला सर्व कचरा साफ केल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा निचरा झाला. ग्रामपंचायत सदस्य श्री बांदेकर यांच्या कार्य तत्पर भूमिकेबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page