राजकोट किल्ल्यावर प्रशासनाने परवानगी दिली नाही तर आम्ही गनिमी काव्याने पुतळा बसवू…

छत्रपती संभाजीनगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा इशारा..

⚡मालवण ता.२९-: राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या पुतळ्याच्या चौथऱ्यावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पुतळा बसविण्यास प्रशासन व पोलिसांनी परवानगी नाकारत महाराजांचा पुतळा माघारी धाडल्यानंतर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी राजकोट किल्ल्यासमोर जमत राजकोट मधील सदर चौथऱ्याचे रूप विद्रुप दिसत असल्याने मुख्य पुतळा पुन्हा उभारेपर्यंत आम्ही आणलेला पुतळा त्याठिकाणी बसावावा या चांगल्या उद्देशाने आम्ही पुतळा आणला असून प्रशासनाने पुतळा बसविण्यास परवानगी द्यावी, अन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसवू, पुतळा बसविल्याशिवाय आम्ही मालवणमधून जाणार नाही, असा इशारा या संस्थेचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी दिला.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर काल रात्री धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मालवणात शिवरायांच्या १५ फुटी पुतळ्यासह दाखल. झाले. हा पुतळा राजकोट किल्ल्यावरील चौथऱ्यावर बसविण्यात यावा अशी मागणी या संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पोलीसांकडे केली. मात्र यास परवानगी नाकारत पोलीसांनी हा पुतळा माघारी पाठवला.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र पुतळा बसविण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने आज या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकोट किल्ल्यासमोर जमत छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देत पुतळा बसविल्याशिवाय मालवण मधून जाणार नाही असा इशारा दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील म्हणाले, राजकोट किल्ला येथील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना कळल्यावर ७०० कि. मी. चे अंतर पार करून अश्वारुढ पुतळा घेऊन मालवण येथे आलो. आम्ही चांगल्या हेतूने पुतळा बसविण्यास आलो आहोत. प्रशासनाने आमची भूमिका समजून घ्यावी. पुतळा पडल्याचे अनेक फोटो व्हायरलं होत आहेत, हे फोटो व्हायरल करून आपणच महाराजांचा अपमान करत आहोत. तसेच पुतळा ज्या चौथऱ्यावर होता तो आता विद्रुप दिसत आहे. त्यामुळे नवा पुतळा बसवेपर्यंत आम्ही आणलेला पुतळा याठिकाणी बसवावा, मग तो कोणाच्याही हस्ते बसविला तरी चालेल, प्रशासन परवानगी देत नसेल तर आम्ही गनिमी काव्याने पुतळा बसवू असेही पाटील म्हणाले.

You cannot copy content of this page