संतोष कानडे:कुडाळ मध्ये माझा लोकराजा महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान..
⚡कुडाळ ता.२४-: कित्येक वर्षापासूनची कोकणची दशावतार ही पारंपरिक लोककला जेष्ठ कलाकारांनी जोपासली आणि तो वारसा पुढील काळातही जोपासला जात आहे. सर्व कलेतील कलाकारांना एकत्र येण्यासाठी सिंधुदुर्ग कला अकादमी असावी.यासाठी तशी मागणी शासनाकडे करून पाठपुरावा सुरू आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल,असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समिती (सिंधुदुर्ग) अध्यक्ष संतोष कानडे यानी कुडाळ येथे माझा लोकराजा महोत्सवात केले.
आपल्या अभिनय संपन्नतेने दशावतार क्षेत्रात लोकराजा म्हणून नावारूपास आलेले जेष्ठ कलाकार सुधीर कलिगण यांच्यासारखे लोकराजा बनण्याचा प्रयत्न नवीन तरुण कलाकारांनी करावा,असे आवाहनही त्यांनी केले.
कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने माझा लोकराजा महोत्सव कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांच्या अध्यक्षास्थनी श्री कानडे होते. श्री मारुती मंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष मंदार शिरसाट,लाजरी क्रिकेट ग्रुप अध्यक्ष राजू पाटणकर ,लोक कलावंत न्याय हक्क समिती सदस्य दिनेश गोरे, राजर्षी श्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य सौरभ पाटकर,सिंधु संप्रदाय भजन संस्था ( कणकवली ) सचिव सुदर्शन खोपे, पखवाज अलंकार महेश सावंत, सत्कार मूर्ती व जेष्ठ दशावतार कलाकार आत्माराम कोरगावकर, सदाशिव धुरी व दिलीप मेस्त्री ,दशावतार नाट्य प्रेमी प्रसाद परब (मोरजी – गोवा), सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मांजरेकर, केरवडेचे उपसरपंच अर्जुन परब ,मालवण तालुका पारंपारिक दशावतार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर ,दशावतार कलाकार विलास तेंडोलकर,आनंद कोरगावकर व कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सिद्धेश कलीगण, लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर ,दीपक भोगटे, स्वरूप सावंत , वावळेश्वर दशावतार मंडळाचे संचालक नाना प्रभू, उपक्रमशील शिक्षक बाबाजी भोई,निवेदक नीलेश गुरव, पत्रकार पद्माकर वालावलकर,काशिराम गायकवाड व राजाराम धुरी आदी उपस्थित होते
दीप प्रज्वलन तसेच श्री गणेश व सुधीर कलिगण यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले, तर निवेदनाची जबाबदारी तालरक्षक हरेश नेमळेकर यानी सांभाळली. यावेळी या संघटनेच्यावतीने महोत्सवाच्या या दुसऱ्या वर्षी या कलेतील योगदानाबद्दल जेष्ठ दशावतार कलाकार आत्माराम कोरगावकर (घावनळे ) व दिलीप मेस्त्री (मोरे) व दशावतारातील जेष्ठ हार्मोनियम सदाशिव धुरी (वाडीवरवडे ) यांचा , तर दशावतारी कलाकार कै.शंकर मोर्ये (मोरे) व कै. बाळू मुणनकर (आवेरे ) यांच्या कुटुंबाचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा राज्य सास्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल दशावतारातील भीष्माचार्य व जेष्ठ दशावतारी कलाकार यशवंत (काका) तेंडोलकर यांचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
माजी खासदार व भाजप नेते नीलेश राणे यांनी या महोत्सवाला भेट दिली. त्यांनी श्री मारुती व गणपती पेटाऱ्याचे दर्शन घेतले. त्यांचा श्री मारुती मंदिर देवस्थान समिती तसेच दशावतार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. माजी सरपंच अरविंद शिरसाट, देवस्थान समिती अध्यक्ष मंदार शिरसाट, व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यशवंत तेंडोलकर यांनी शासन व रसिक आम्हा कलाकारांमध्ये आशेने पाहते.ही कला समाज प्रबोधनाचे काम करीत आहे,असे सांगून लोकराजा सुधीर कलीगण यांच्या या कार्यक्रमाला तरी या तालुक्यातील दशावतार कलाकारांनी उपस्थिती दर्शविली पाहिजे होती ,अशी खंत व्यक्त केली. सिद्धेश कलीगण यानी यापुढेही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दशावतार संघटनेचे तालुका सचिव निळकंठ सावंत, उपाध्यक्ष ओंकार सावंत ,सल्लागार मोरेश्वर सावंत,खजिनदार प्रशांत तेंडोलकर, शिवप्रसाद मेस्त्री, उदय मोर्ये, विनायक सावंत, राजू केरवडेकर, विष्णू बंगे,भरत मेस्त्री,बंड्या परब , संतोष राणे, संतोष सामंत ,दिनेश मांजरेकर , दिप निर्गुण, यश जळवी, सदाशिव मोडक , निखिल निकम , संजय नाईक, संजय वालावलकर , योगेश कोंडुरकर, संजय पाटील ,आशिष तवटे, अमित परब,अमोल आकेरकर ,प्रतिक कलिगण यांच्यासह अन्य दशावतारी कलाकार उपस्थित होते.
दत्तमाऊली पारंपारिक लोककला बहुउद्देशीय मंडळ (सिंधुदूर्ग ) अध्यक्ष बाबा मयेकर,दत्तप्रसाद शेणई, सावंतवाडी दशावतार कलाकार संघटनेचे खजिनदार नारायण आसयेकर, भूमिका दशावतार मंडळाचे मालक नितीन आसयेकर, नाट्य प्रेमी विनायक भागवत यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. आभार संघटनेचे अध्यक्ष चारूदत्त तेंडोलकर यानी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
