आचरे गावच्या गौरव वझे याचे मुंबई विद्यापीठ स्तरावर सुयश…

⚡मालवण ता.२४-:
आचरा पिरावाडी येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर या माध्यमिक प्रशालेचा माजी विद्यार्थी आणि आचरा हिर्लेवाडी येथील रहिवासी गौरव प्रदीप वझे याने रत्नागिरी येथील फिनोलेक्स इंजीनियरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनीयर शाखेत संपूर्ण मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स या शाखेत तिसरा क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे.

गौरव वझे हा आचरा दशक्रोशी ब्राह्मण मंडळाचे सभासद श्री. प्रदीप वझे (आचरा हिर्लेवाडी) यांचा मुलगा आहे. त्याने इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्री रामेश्वर विद्यामंदिर, पिरावाडी या शाळेतून पूर्ण केले होते. मुंबई विद्यापीठ स्तरावर गौरव याने मिळविलेल्या या यशाबद्दल आचरे दर्शक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page