*💫कणकवली दि २६-:* भारताचा संविधान दिवस म्हणून २६ नोव्हेंबर साजरा केला जातो. संविधान दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस असून भारताच्या इतिहासात त्यास एक अद्भुत व अनन्यसाधारण घटना म्हणून महत्व आहे. याच संविधान दिवसाला फक्त शुभेच्छातून साजरा न करता आपल्या कलेने कणकवली मधील सुमन दाभोलकर या कलाकाराने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र वागदे जवळील गडनदीतील मोठ्या दगडावर रेखाटत संविधान दिना निमित्त एक आगळी वेगळी मानवंदना यावेळी दिली आहे. दरम्यान, आंबोली टाईम्स’ला चित्रकार सुमन दाभोलकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, एक चित्रकार म्हणून समाजात आजूबाजूस घडत असलेल्या गोष्टींवर मला माझ्या कलाकृतीतून व्यक्त व्हावं असं नेहमी वाटत असतं. म्हणूनच त्याच जाणिवेतूनच आज कणकवली येथील वागदे हायवे लगत असलेल्या गडनदीवर प्रत्यक्ष नदीत उतरून एका मोठा दगडावर संविधान दिवसाबद्दल आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र साकारत एक कलाकार म्हणून माझ्याकडून भारतीय संविधानास त्या मानवंदना होय. तर चित्र साकारतेवेळी एक वेगळी भावना उराशी होती. तसेच हा अनुभव देखील खूप छान होता.
कणकवली येथील चित्रकार सुमन दाभोलकर यांच्याकडून आगळी वेगळी मानवंदना…
