ओवळीये गावातील आरोग्य तपासणीचा आ.वैभव नाईक यांनी घेतला आढावा

तापसरीने निधन झालेल्या दिव्या खांदारे हिच्या घरी भेट देत केले सांत्वन

*💫कुडाळ दि.२६-:* ओवळीये वायंगणीवाडी येथील दिव्या आबा खांदारे या १८ वर्षीय मुलीचे तापसरीच्या आजाराने निधन झाले. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी खांदारे यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. ओवळीये गावात अन्य काही जणांना तापाची साथ सुरु असल्याने आरोग्य विभागामार्फत तेथील लोकांची आरोग्य तपासणी सूरु करण्यात आली आहे. याठिकाणी देखील आ. वैभव नाईक यांनी भेट देत आरोग्य तपासणीचा आढावा घेतला. ओवळीयेतील तापसरीच्या सर्व लोकांचा शोध घेऊन सर्वांची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना यावेळी आ. वैभव नाईक यांनी मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांना दिल्या. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या रेण्विय प्रयोगशाळेशी संपर्क साधत तपासणीचे रिपोर्ट ताबडतोब देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, उपसरपंच सत्यविजय घाडीगावकर, प्रकाश खांदारे, हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शामराव जाधव, श्रीमती साळकर व अधिपरिचारिका,कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page