केवळ डंपर चालकावर गुन्हा नको तर चिरेखाण अधिकृत आहे का तपासा:मनसेच्या महेश परब यांचे पोलिसांना आवाहन..
⚡सावंतवाडी ता.२४-: मळेवाड येथे घडलेली घटना ही धक्कादायक असून, मनसेने वारंवार चिरे खाणीबाबत लक्ष वेधून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पोलिसांनी केवळ डंपर चालकावर गुन्हा दाखल न करता, सबंधित खाण अधिकृत आहे कि अनधिकृत यांची देखील तपासणी करून, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे महेश परब यांनी केली आहे.
दरम्यान मनसेने वारंवार लक्ष वेधून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने यांची सखोल चौकशी करून सबंधित खाण मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
