ठाकरे गटाची कुडाळ मध्ये लाखाची दहीहंडी…

युवा सेनेच्या वतीने आयोजन:मंदार शिरसाट यांची माहिती..

⚡कुडाळ ता.२३-: आमदार वैभव नाईक पुरस्कृत शिवसेना ठाकरे गट युवा सेना यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी कुडाळ जिजामाता चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाख मोलाची निष्ठेची दहीहंडी असे या दहीहंडीला ओळ्खले जाणार असून या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत अशी माहिती युवा सेना उपजिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंदार शिरसाट म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुका व कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार वैभव नाईक पुरस्कृत ही मानाची लाख मोलाची निष्ठेची दही हंडी असून त्याचे बक्षिस १ लाख रुपये आहे. दि. 27 ऑगस्टला जिजामाता चौक येथे संध्याकाळी ठीक 5.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन या उत्सवाचा शुभारंभ होणार आहे.
या निमित्ताने संध्या ६ वाजल्यापासून द रॉकरर्स बॉलीवूड बॅंडचा आर्केट्रा, महिलांसाठी खास कार्यक्रम, असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या दहीहंडी उत्सवात नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून सहभागी संघास २५०० रुपये देण्यात येतील. तसेच ४ थर लावणाऱ्या पथकाला ४ हजार , ५ थरसाठी ५ हजार, ६ थरासाठी ६ हजार , ७ थरासाठी ७ हजार , ८ थरासाठी ८ हजार अशी पारितोषिके आहेत. अधिक माहितीसाठी गोट्या चव्हाण (९६७३०११८७६), गुरु गडकर (९५२७२६२४२८), अमित राणे (९१५८१५५८८९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मंदार शिरसाट यांच्यासह उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, गोट्या चव्हाण, संदीप म्हाडेश्वर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page