सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२४-: मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी तालुक्यातील शालेय व महाविदयालयीन विदयार्थी, विदयार्थिनींसाठी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धा सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी शाळेच्या सभागृहात घेण्यात येईल.रविवार दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 09:30 वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल.

स्पर्धा 1)पहीली ते चौथी मुले, 2)पाचवी ते सातवी मुले, 3)आठवी ते महाविदयालयीन मुले, 4)पहीली ते सहावी मुली, 5)सातवी ते महाविदयालयीन मुली या मुलांच्या व मुलींच्या पाच वेगवेगळ्या गटात खेळविण्यात येणार आहे.
प्रत्येक गटात पाच क्रमांक अशा एकूण पंचवीस क्रमांकांना रोख बक्षिस, चषक, मेडल, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.इयत्तेच्या गटाप्रमाणे एका स्पर्धकाला वेगवेगळया खेळाडूंसोबत खेळायला मिळणार आहे.राष्ट्रीय बुदधिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल.स्पर्धेत नाव देण्यासाठी व इतर माहीतीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या 8007382783 मोबाईल क्रमांकावर संपर्क करायचा आहे.स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नावे घेतली जातील.

You cannot copy content of this page