मालवण तालुक्यातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर…

माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते केले मंजूर पत्राचे वितरण..

मालवण दि प्रतिनिधी :
राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीच्या वतीने मालवण तालुक्यातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून शासनाच्या माध्यमातून कलाकार मानधन योजनेचा त्यांना मिळणार आहे. या कलाकारांना मंजूर पत्राचे वितरण भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीच्या वतीने मालवण तालुक्यातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून यामध्ये मुकुंद सावंत कट्टा वरची गुरामवाडी, महादेव गावडे मोगरणे गावडेवाडी, शिवा मिस्त्री मसुरे देउळवाडा, चंद्रकांत पेडणेकर मर्डे कावा मसुरे, रमाकांत पाताडे सुकळवाड पाताडेवाडी, उमेश साईल पळसंबं वरचीवाडी, विल्सन गिरकर रेवताळे मालवण, राजेंद्र कोदे कांदळगाव देउळवाडी, विजय कुडाळकर काळसे बागवाडी, नादार तुळसकर देवबाग शिवलकरवाडी, प्रकाश पेडणेकर सुकळवाड भंडारवाडी, धनंजय वांगणकर पेंडूर सोनारवाडी, मंगेश गायकवाड तिरवडे भाकरवाडी यांचा समावेश आहे

हे सर्व प्रस्ताव माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार मानधन समितीच्या वतीने प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून भाजपा नेते निलेश राणे यांच्या सुचनेनुसार यापुढेही मालवण कुडाळ तालुक्यातील जास्तीत प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न राहील. अशी माहिती समिती अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.

यावेळी कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, समिती सदस्य अजिंक्य पाताडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर संदीप परब, यांसह पदाधिकारी व कलाकार उपस्थितीत होते.

फोटो :
मालवणातील कलाकारांचे मानधन प्रस्ताव मंजूर झाले असून भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते मंजूरी पत्र कलाकारांना प्रदान करण्यात आली

You cannot copy content of this page