जिल्ह्यातील ५५० कंत्राटी वीज कामगारांना ४ सप्टेंबरपूर्वी पगार द्या…

अशोक सावंत: कामगाराच्या प्रश्नांसाठी भेट घेऊन चर्चा केली…

⚡मालवण ता.२२-:
पुढील महिन्यात गणेश चतुर्थीचा सण असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काम करत असलेल्या वीज वितरणच्या ५५० कंत्राटी कामगारांचा पगार सप्टेंबर महिन्याच्या ४ तारीखच्या अगोदर देण्यात यावा, अशी मागणी कामगार नेते अशोक सावंत यांनी वीज महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक साळुंखे तसेच कुडाळ विभागीय कार्यालय मधील कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांच्याकडे करत तशा सूचना वीज कंपनी प्रशासनाने संबंधित ठेकेदाराना द्यावी, असे आवाहन केले.

कुडाळ महावितरण सर्कलचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक साळुंखे तसेच कुडाळ विभागीय कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांची कामगार नेते अशोक सावंत आणि वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गचे पदाधिकारी यांनी कामगाराच्या प्रश्नांसाठी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अशोक सावंत यांच्या समवेत वीज कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. संदीप बांदेकर, सचिव योगराज यादव, गणेश राऊळ, करण परब, शुभम केरकर, संकेत शिंदे, अजित पालकर, मुरलीधर देसाई आदी उपस्थित होते.

कुडाळ डिव्हिजनमधील कायम कामगारांच्या रिक्त जागेवर कंत्राटी कामगाराना त्या जागेवर १ आठवडा झाला तरी अजूनही कंत्राटी कामगाराना ऑपरेटर या पदावर हजर होण्यासाठी ऑर्डर देण्यात आली नसल्यामुळे त्यांना घरी बसावे लागल्याने त्यांची गेरहजरी लागत आहे. या संदर्भात त्या ऑपरेटर व लाइनस्टाफ याची संबंधित ठेकेदाराला सांगून त्वरित कामगाराना कामाची ऑर्डर देवून कामावर हजर करण्यात यावे असे यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावर महावितरण प्रशासन यांनी संबंधित ठेकेदारला त्या कंत्राटी कामगार यांना ऑर्डर त्वरित देण्यासाठी कळविले आहे. तसेच कामगारांच्या कामाची वेळ किती आहे हे सांगावे, त्यानी किती तास काम करावे यावर चर्चा करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी ओरोस सेक्शन ऑफिसमधील कै. चेतन बिड्ये या कामगाराचे आकस्मिक निधन झाले. यावेळी ७२ तासाच्या आत त्याची ESIC ऑफिसला नोंदणी करणे आवश्यकता आहे. ती नोंदणी त्वरित करण्यात यावी, जेणेकरून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकणार आहे असे यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

You cannot copy content of this page