मनसेचे धीरज परब आणि कुणाल किनळेकर यांची माहिती…
⚡कुडाळ ता.२०-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुडाळ तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय पारितोषिक३००१, तृतीय पारितोषिक२००१. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा व पर्यावरण पूरक घरगुती सजावट केलेला गणपती बाप्पाचा फोटो व 40 सेकंदाचा व्हिडिओ 9405582096 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा. पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे विद्यार्थी सेनेचे यातिन माजगावकर महाराष्ट्र सैनिक अक्षय जोशी यांनी केले आहे.
