मळगाव येथील रवळनाथ देवाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात…

दिंडी व महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता..

सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्य उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या (दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज दिंडी व महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी रवळनाथ देवाचे दर्शन घेत हरिनाम सप्ताहाचा लाभ घेतला.


काल सोमवार सकाळपासून हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त रवळनाथाची मूर्ती सुशोभित वस्त्र घालून नटविण्यात आली होती. भाविकांनी सकाळपासून गर्दी करून श्री देव रवळनाथाचे दर्शन घेतले. यावेळी देवाला केळी, नारळ अर्पण करण्यात आले. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, श्री देव रवळनाथ देवावर अभिषेक, होमहवन, मंत्रपठण, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम ब्राम्हणांच्या साक्षीने पार पडले. यनिमित्त सकाळपासून मळगाव येथील भूतनाथ भजनमंडळ (कुंभारवाडी), बंटी मेस्त्री भजनमंडळ (सुतारवाडी), जय हनुमान भजनमंडळ (पिंपळवाडी), विठ्ठल-रखुमाई भजनमंडळ (कुडववाडी), बाबी लातये पुरस्कृत बाळ गोपाळ भजनमंडळ (तेलकाटावाडी), अष्टविनायक भजनमंडळ (कुंभारआळी), इस्वटी भजनमंडळ (रेडकरवाडी), मायापूर्वचारी भजनमंडळ (बादेकरवाडी), धाव गिरोबा भजनमंडळ (सावळवाडा), पाडगावकर भजनमंडळ (पाडगावकरवाडी), महापुरुष भजनमंडळ (जोशी-मांजरेकरवाडी), गणेश प्रसादी मंडळ (नाईकवाडी), राष्ट्रोळी भजनमंडळ वरची-देऊळवाडी) आदी स्थानिक भजनमंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या भजनांचा मळगावातील भजनप्रेमींनी लाभ घेतला. आज सकाळी विठू नामाच्या जयघोषात व ढोलांच्या गजरात भव्य अशी दिंडी काढून नारळ नदीत अर्पण करण्यात आला. त्यानंतर गोपाळकाला व महाआरती पार पडली. दुपारी रवळनाथ मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालून हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. मळगाव पंचक्रोशीतील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page