योजनेचा लाभ मिळण्यासाठी बाळु सावंत यांनी पुढाकार घेत आयोजित केलेले विशेष शिबीर कौतुकास्पद…

सौ.श्वेता कोरगावकर: शिबिराला लाभार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद..

बांदा/प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाने समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध जनकल्याणकारी योजना सुरु केल्या असून या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी उपसरपंच बाळु सावंत यांनी पुढाकार घेत आज आयोजित केलेले विशेष शिबीर हे कौतुकास्पद आहे. या शिबिराचा माध्यमातून जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असल्याने स्थानिकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी येथे केले.

बांदा शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदार हरकती, बदल तसेच शासनाची लाडकी बहीण योजना अर्ज स्वीकारणे यासंह अनेक शासकीय योजनाची माहिती होण्यासाठी येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबीराचे उदघाट्न मान्यवरांच्या उवस्थितीत दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, माजी सरपंच अक्रम खान, बाळा आकेरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, रेश्मा सावंत, दीपलक्ष्मी सावंत-पटेकर, गुरु कल्याणकर, सिद्धेश पावसकर, दशरथ घाडी आदी उपस्थित होते.
या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज घेण्यात आले. तसेच मतदार यादीतील नाव दुरुस्ती, बदल, राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, महिला व तरुणांना व्यवसायासाठी कुक्कुटपालन योजना यासंह अनेक इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी या विशेष शिबिराला लाभार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या शिबिरासाठी शासनाच्या केंद्रीय जनकल्याणकारी योजनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बाळु सावंत यांनी केले. स्वागत अक्रम खान यांनी केले. सूत्रसंचालन बाळा आकेरकर यांनी केले. आभार दशरथ घाडी यांनी मानले.
यावेळी मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, निलेश कदम, गुरुनाथ धारगळकर, विकी कदम, निलू देसाई, साहिल कल्याणकर आदिसह भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page