उपनगराध्यक्ष वराडकर, नगरसेवक कुशेचे विरोध करण्याचे एकमेव काम…

गेल्या चार वर्षात किती विकासनिधी आणला यांचीही माहिती द्यावी;नगराध्यक्ष महेश कांदळकर यांची टिका

मालवण (प्रतिनिधी) नगराध्यक्ष मूग ‍गिळून गप्प का बसले याचा शोध घेण्यापेक्षा तसेच सध्या वाढत चाललेल्या कोरोनाच्या काळात उपाययोजनेत सर्व शासकीय यंत्रणा व्यस्त असतांना बेकायदेशीर उपोषण करण्यापेक्षा उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी सध्या या तीन दिवसात कोरोना विषयी जनजागृती करण्यात वेळ खर्च घातला असता तर ती खरी जनसेवा झाली असती. मुख्याधिकारी यांनी आपल्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे निर्देश येतील त्या प्रमाणे कार्यवाही करण्याचे आणि कोव्हीड काळात असे उपोषण न करणेबाबत विनंती करुनही तसेच या प्रश्नांबाबत यापूर्वी फेबुवारी २०२१ मध्ये उत्तर दिल्याचे सांगूनही वराडकर आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहील्या बद्दल आर्श्चय वाटते. वराडकर यांनी आपला कार्यकाळ फक्त माहितीचे अधिकार आणि जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात घालविण्यापेक्षा नगरपरिषदेच्या विकासकामात लक्ष दिला असता तर ते जनतेला अधिक भावले असते. गेल्या चार वर्षात कुठला प्रस्ताव मंजूर करुन किंवा कुठला निधी नगरपरिषदेमध्ये आणला यांचीही माहिती द्यावी, जनतेच्या भल्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात आम्हाला श्रेय मिळेल म्हणून राजकीय विरोध करण्याचे एकमेव काम सध्या उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि नगरसेवक गणेश कुशे करीत आहेत, अशी टीका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली. नगरपालिकेत मनमानी व गैरकारभार सुरू असल्याचा आरोप करत उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांनी आपल्या मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. वराडकर व कुशे यांनी केलेल्या आरोपांना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी नगरसेवक मंदार केणी उपस्थित होते. महेश कांदळगावकर म्हणाले, मालवण नगरपरिषदेची भाजी मार्केट इमारत ही ३० वर्ष झाल्याने जिर्ण झाली होती. त्याठिकाणी सूसज्ज असे नवीन मार्केट बांधण्याबाबत तात्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयेचा प्रस्ताव मंजूर करुन आणला. जी इमारत धोकादायक होती त्याचा अहवाल घेवून ती पाडून टाकण्यात आली. याबाबत संबंधीत गाळेधारकांना नवीन इमारतीमध्ये प्राधान्याने गाळे वाटप करण्यात यावे अशा प्रकारचा नगरपरिषद ठराव १९५ दि.२४/१२/२०२० रोजी करण्यात आला. असे असतांना कुठल्याही गाळेधारकाची तक्रार नसताना वराडकर व कुशे यांच्या पोटात पोटशूळ कशामुळे पडले याचाही विचार होणे गरजेचे आहे. एवढीच नगरपरिषदेची काळजी होती तर सध्या अस्तीत्वात असलेला गाळा अन्य कोणाला मिळू नये म्हणून आपल्याच मर्जीतल्या व्यक्तीला लिलावात भाग घेण्यास सांगून चढ्या दराने लिलाव मंजूर करुन घेतला. पण हा गाळा ताब्यात घेतला नाही. त्यामुळे हा गाळा वर्षभर बंद स्थितीत पडून राहिला. स्वत:च्या मर्जीतील व्यक्तीमुळे झालेल्या आर्थीक नुकसानीबाबत आंदोलन का केले गेले नाही. वास्तविक पाहाता जो गाळा पाडणेबाबत उपोषण सुरु आहे. तो गाळा ८ ते १० वर्षापूर्वी नव्याने बांधलेला आहे. त्यामुळे या गाळयाचा लिलाव करणेत आलेला होता, असे कांदळगावकर म्हणाले. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी चुकीच्या पध्दतीने गाळा दिल्याबद्दल किंवा धोकादायक गाळा असतांना न तोडल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार असेल तर याबाबत योग्य तो निर्णय जिल्हाधिकारी घेतील त्यानुसार प्रशासकीय कार्यवाही करणेत येईल, असेही कांदळगावकर म्हणाले. स.का. पाटील कॉलेजने ९९ वर्षाच्या लिजवर दिलेल्या जागेत बॅडमिंटनचे काम सुरु आहे. मालवणातील बँडमिंटनप्रियखेळाडूंची तशा प्रकारची वारंवार मागणी असल्याने शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेऊन हे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत संबंधीत संस्थेचे चेअरमन आणि बहुतांशी सदस्य याबाबत सकारात्मक असताना फक्त गणेश कुशे आणि काही मंडळी याबाबत आम्हाला त्याच श्रेय मिळेल म्हणून राजकारण आणून या हॉलला विरोध करत आहेत. याबाबत काही चुका असतील तर त्या एकत्र बसून सोडविण्या ऐवजी हे काम कसे बंद पडेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या बॅडमिंटन हॉल बांधणीबाबतचा जी निविदा मंजूर करणेत आली सूचक म्हणून चंद्रशेखर कुशे आणि अनुमोदक म्हणून राजन वराडकर यांचे नाव आहे. जर यामध्ये त्रुटी होत्या तर त्यावेळीच विरोध का झाला नाही. मग कुठल्या कारणासाठी अचानक विरोध सुरु झाला हे समजण्या इतकी जनता सुज्ञ आहे, असेही कांदळगावकर म्हणाले. आमच्या कालावधीत नवीन नळपाणी योजना, बॅडमिंटन हॉल, भाजी मार्केट अग्निशमन इमारत, जलतरण तलाव, म्युझीकल फाऊंटन अशी जनहिताचे अनेक कामे प्रस्तावित केली. परंतू प्रत्येक वेळी यांचे श्रेय आम्हाला मिळेल या एका राजकीय हेतून प्रेरित होऊन यांनी मालवणच्या विकासाला खिळ घालण्याचेच काम केले आहे, असा आरोप कांदळगावकर यांनी केला. आमच्या कामाचे प्रगती पुस्तक आम्ही येणाऱ्या निवडणूकीत जनते स

You cannot copy content of this page