Headlines

पोलीस ठाणे कणकवलीच्या वतीने शिवडाव हायस्कूलमध्ये “डायल ११२” तसेच “नशामुक्त भारत” अभियान संपन्न…!

⚡कणकवली ता.१२-: कणकवली पोलीस ठाणे यांसकडून नुकतच शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे सायबर क्राईम तसेच बालक, महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी या दृष्टीने आवश्यक असे मार्गदर्शन करण्यात आले. नशा मुक्त भारत अभियान सिंधुदुर्गात सर्वत्र राबविल जात आहे. व्यसन म्हणजे जिवंत मरण, व्यसन सोडा, बहरेल जीवन अशी जनजागृती करण्यात आली….

Read More

पिग्मी एजंटवर आकसाने कारवाई…

सुशांत नाईक:जिल्‍हा बँकेच्या ओरोस कार्यालयासमोर उपोषण छेडणार.. ⚡कणकवली ता.१२-: केवळ शिवसेना पक्षाचे काम करतात म्‍हणून मोंड येथील जिल्‍हा बँकेच्या एका पिग्मी एजंटला काढून टाकण्यात आले आहे. दरमहा सुमारे तीन लाखाची उलाढाल असूनही राजकीय आकसापोटी या पिग्मी एजंटवर कारवाई करण्यात आली आहे. या विरोधात सोमवारी १६ डिसेंबरला जिल्‍हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयासमोर आपण लाक्षणिक उपोषण…

Read More

टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा…

सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करुया:जिल्हाधिकारी अनिल पाटील.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो औषधोपचाराने पूर्णत: बरा होतो. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार सुरू करावा. त्वरित निदान आणि योग्य औषधोपचारामुळे क्षयरोग पूर्णपणे बरा होत असल्याने सर्वांनी यासाठी प्रयत्न करुन सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील…

Read More

जिल्हा बँक अध्यक्षांकडून सावंतवाडी शहरातील महिला विक्रेत्यांशी संवाद…

व्यवसायाला हातभार लावणाऱ्या योजना अधिकाऱ्यांमार्फत राबविण्याची दिली ग्वाही ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सावंतवाडी शहरातील किरकोळ विक्रेत्या महिलांशी संवाद साधला. सावंतवाडी येथे कार्यक्रमानिमीत्त आले असता त्यांनी या आत्मनिर्भर महिलांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारपूस केली. तसेच डिजीटल पेमेंटसाठी क्युआरकोड मशिन व जिल्हा बँकेकडून व्यवसायाला हातभार लावणाऱ्या योजना अधिकाऱ्यांतर्फे पोहचवण्याची ग्वाही यावेळी…

Read More

आमदार नितेश राणे यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालयाला सदिच्छा भेट…!

⚡सावंतवाडी ता.१२-: भाजपा आमदार नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालय सदिच्छा भेट दिली. २७,२८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांताचे ५९ वे कोंकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ही भेट राणेंनी दिली. सावंतवाडी येथे आ नितेश राणे यांनी सदिच्छा…

Read More

कर्नाटक ट्रॉलर्सची घुसखोरी कायम…

रविकिरण तोरसकर यांचा आंदोलनाचा इशारा:मत्स्य विभागला ३१ डिसेंबर २०२४ ची डेडलाईन.. ⚡कुडाळ ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी जलधिक्षेत्रात परप्रांतीय लोकांची घुसखोरी वाढल्याने तात्काळ नवीन हायस्पीड गस्ती नौका कारवाईसाठी उपलब्ध करून देण्यात यावी आणि परप्रांतीय नौकांवर तात्काळ करण्यास कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी श्रमिक मच्छीमार संघाच्या वतीने रविकिरण तोरसकर यांनी जिल्ह्याचे…

Read More

चौकुळ गावच्या सरपंच पदी गुलाबराव गावडे यांची नियुक्ती…

⚡आंबोली ता.१२-: चौकुळ गावच्या सरपंच पदी गुलाबराव गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.दरम्यान आंबोली पंचायत समिती मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून‌ सरपंच पदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

कणकवली परबवाडी येथील श्री दत्तमंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन…!

⚡कणकवली ता.१२-: येथील श्री दत्तमंदिर परबवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी १० वाजता झोळी फिरणे, सायंकाळी ६ :०२ वाजता दत्तजन्म, रात्रौ ८ वाजता महाप्रसाद, रात्रौ ९:३० वाजता भजनांचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

कणकवली येथे साहित्य- संगीत संमेलनाचे आयोजन…

कणकवली : साहित्य-संगीतप्रेमी मित्रमंडळ कणकवलीतर्फे जानेवारी २०२५ मध्ये कणकवली येथे साहित्य- संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य संगीत रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी केले आहे. एका कलेचा दुसऱ्या कलेशी निकटचा संबंध असतो. किंबहुना सर्वच कला एकमेकांशी प्रवाहित झालेल्या असतात. साहित्य आणि संगीत या…

Read More

मोती तलावात अज्ञात इसमाचा मृत्यूदेह तरंगताना आढळला…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील नगर परिषदेच्या समोर मोती तलावात अज्ञात इसमाचा मृत्यूदेह तरंगताना आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Read More
You cannot copy content of this page