Headlines

पद्मिनी भागवत यांचे दुःखद निधन…

सावंतवाडी ता.१६-: येथील विठ्ठल मंदिर मधील पुजारी श्री प्रमोद भागवत यांच्या पत्नी सौ. पद्मिनी प्रमोद भागवत यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून, त्यांच्यावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती ,मुलगा, मुलगी , जावई, आई असा परिवार आहे.

Read More

“आभाळमाया” ग्रुपने सलग चौथ्या वर्षी गाठला २०० रक्तदात्यांचा टप्पा…

२३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान: वराडकर हायस्कूल कट्टा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;आभाळमाया ग्रुप व जी एच फिटनेस कट्टा यांच्या वतीने आयोजन.. ⚡कुडाळ ता.१६-: सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने वराडकर हायस्कूल कट्टा येथे रविवार, १५ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…

Read More

मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट…

⚡नागपूर ता.१६-: महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे ही सदिच्छा भेट घेतली.

Read More

माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणार…

मंत्री नितेश राणे:माझ्या पदाचा जनतेच्या हितासाठी प्रामाणिक उपयोग करणार.. ⚡कणकवली ता.१६-: देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या मध्यमनातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के…

Read More

पर्जन्यमापक, तापमान मापक, वायू मापक यंत्रांची डागडुजी करा…

शेतकरी, बागायतदार संघटना अध्यक्ष विलास सावंत यांचे तहसीलदारांना निवेदन. बांदा ता.१६-:अवेळी पडलेल्या पावसामुळे हवामानातील अनियमिततेचा फटका शेतकरी बागायतदारांना बसतो. बऱ्याच वेळा महसूल मंडळ कार्यालयांकडे पर्जन्यमापक, तापमानमापक व वायूमापक यंत्रात समस्या असल्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सदर यंत्रांची डागडुजी वेळोवेळी करावी अशी मागणी, सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार…

Read More

सायबर जनजागृतीसाठी बांदा शहरात रॅली…

बांदा/प्रतिनिधीसायबर जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे व खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल आणि तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा यांच्या वतीने बांदा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.सकाळी १०. ३० ते १२ वाजेपर्यंत बांदा शहरातील मुख्य बाजारपेठ येथे रॅली काढून सायबर जनजागृती, नशा मुक्ती व डायल ११२ या विषयांबाबत जनजागृती करण्यात आली. सदर रॅलीत बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस…

Read More

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून ‘ओऍसिस’ प्रथम…

मालवणच्या शुभदा टिकम यांना सलग तीन वर्षे अभिनयाचे पारितोषिक.. ⚡मालवण ता.१६-: महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण या संस्थेच्या ‘ओऍसिस’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. तसेच सातार्डे मध्यवर्ती संघ, कवठणी या संस्थेच्या गावय या नाटकास द्वितीय…

Read More

राष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करण्यासाठी आमचा पुढाकार…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी:पुणे जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाने दिली जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट.. ओरोस ता १६आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत. सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात. त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धायुगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आम्ही डोअर स्टेप बँकिंगचा पहिला…

Read More

जिल्हा बँकेला आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंग पुरस्कार बहाल…

ओरोस ता १६सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंग हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.आयकॉनिक लीडरशिप अवॉर्ड 2024 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंगसाठीचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गोवा येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा…

Read More

उपजिल्हा रुग्णालयात रिक्त तज्ञ डॉक्टरांची पदे भरा…

भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांची मागणी:ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन यंत्रणा चालू ठेवण्याची अधीक्षकांकडे केली मागणी.. सावंतवाडी ता.१५-:येथिल उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली हदयरोग तज्ञ आणी भुलतज्ञाची मंजूर असलेली प्रत्येकी दोन पदे तात्काळ भरण्यात यावीत तसेच ऑपरेशन थिएटर आणी सीटीस्कॅन यंत्रणा कायम चालू रहावी यासाठी जनरेटरची सोय तात्काळ करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी महीला भाजपाच्या माध्यमातून…

Read More
You cannot copy content of this page