तोंडवळी ग्रामस्थांचे साखळी उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच…!

⚡मालवण ता.१८-: कालावल खाडीपात्रातील तोंडवळी येथे होणाऱ्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात दि. १५ जानेवारी पासून ग्रामस्थांनी खाडीपात्रात नौकेत बसून छेडलेले साखळी उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच होते. काल व आज असे दोन दिवस कोणताही प्रशासकीय अधिकाऱ्याने या उपोषण स्थळी भेट दिलेली नाही किंवा या आंदोलनाबाबत प्रशासनाकडून कोणतेही म्हणणे ग्रामस्थांना प्राप्त झालेले…

Read More

सिंधुदुर्गाच्या पालकमंत्रीपदी नितेश राणे यांची नियुक्ती…

⚡कणकवली ता.१८-: राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला पालकमंत्री वाटपाचा तिढा अखेर आज सुटला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अपेक्षेप्रमाणेच कणकवली मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जल्लोषाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर कणकवली मतदारसंघाला पालकमंत्री पदाचा मान मिळाला असून…

Read More

चिवला बीच येथे दोन कासव मृतावस्थेत सापडली…

⚡मालवण ता.१८-:मालवण चिवला बीच येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीची दोन समुद्री कासव मृतावस्थेत आढळून आली. याबाबत स्थानिक नागरिक कैतान सोज यांनी मालवणमधील वन्यजीव प्रेमी व कोकण वाइल्ड रेस्क्यूअरच्या सल्लागार सौं. शिल्पा यतीन खोत यांना माहिती दिली असता सौ. खोत यांनी वन, कांदळवन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी चिवला बीच येथे दाखल होत मृत कासवांची…

Read More

तलाठी व तलाठी कार्यालय प्रश्नी वायंगणी ग्रामस्थांनी २६ रोजीचा दिलाय उपोषणाचा इशारा…

मालवण (प्रतिनिधी) वायंगणी गावातील तलाठी कार्यालयात आठवड्यातील एक दिवस कार्यरत असणारे तलाठी त्यादिवशी देखील उपलब्ध होत नसून तलाठी कार्यालयाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. याबाबत तहसील कार्यालयाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने वायंगणी येथील ग्रामस्थ दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वायंगणीचे सरपंच रुपेश पाटकर यांच्यासह…

Read More

सावंतवाडी सर्वोदनगर येथील रहिवाशांकडून १९ रोजी परिसर स्वच्छता मोहिमाच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१८-: सर्वोदनगर सावंतवाडी येथील रहिवाशांकडून १९ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. परिसर स्वच्छता मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. सावंतवाडी नगरपरिषद यांच्या सहकार्याने व रहिवाशांच्या स्वच्छतेच्या सामाजिक जाणीवेतून ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. नुकतेच सर्वोदय नगर येथील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने एक संघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला…

Read More

भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१८-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन आणि आवडत्या पुस्तकावर परिक्षणात्मक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उदघाटन प्राचार्य डॉ.रमण बाणे यांचे हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रदर्शनात थोर व्यक्तींची चरित्रे , आत्मचरित्रे, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी ग्रंथ, संदर्भ ग्रंथ…

Read More

मासे वाहतूक करणारा कंटेनर पलटी…

चालक जागीच ठार:नेमळे येथील पहाटेची घटना; पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद.. ⚡सावंतवाडी ता.१८-:झाराप – पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात कर्नाटकवरून गुजरातला मासे घेऊन जाणारा कंटेनर ड्रायव्हरला झोप आल्याने नेमळे कुंभारवाडी येथे हायवेच्या खाली २० फूट खाली कोसळून पलटी झाला. यात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेला दुसरा ड्रायव्हर सुदैवाने बचावला आहे….

Read More

शहरातील सालईवाडा येतीलरस्त्याचे कॉंक्रिटीकरण व गटार बंदिस्तीच्या कामाचे भूमिपूजन…!

⚡सावंतवाडी ता.१८-: शहरातील सालईवाडा येतील आपला दवाखाना ते बोंद्रे दुकान पर्यंतच्या रस्त्यावरील गटार बंदिस्तीचे व नाटेकर पानंदीतील महाडेश्वर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व गटार बंदिस्ति च्या विकास कामाचे भूमिपूजन आज पार पडले. त्याप्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, शिवसेना महिला शहर अध्यक्षा सौ भारती मोरे, गजानन नाटेकर, विनोद सावंत, मा. नगरसेवक, परिमल नाईक, सुरेंद्र…

Read More

उपरलकर देवस्थानचा 6 फेब्रुवारीला वार्षिक अभिषेक पूजा साेहळा…

⚡सावंतवाडी ता.१८-:महाराष्ट्र व गाेवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळा गुरुवार 6 फेब्रुवारी 2025 राेजी साजरा हाेणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी माेठा उत्सव म्हणून साजरा हाेताे.यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.गुरुवार…

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार आबा खवणेकर यांची फेरनिवड..

तर उपाध्यक्ष पदी समिल जळवी,उपाध्यक्ष पदी शिरीष नाईक,सचिव पदी कृष्णा सावंत,खजिनदार पदी संजना हळदिवे,सहसचिव पदी सलिल पालव यांची करण्यात आली निवड.. ⚡सिंधुदुर्ग दि.१७-: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात घेण्यात आली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच या संघटनेचे पूर्वी कार्यरत असलेले मिलिंद…

Read More
You cannot copy content of this page