माजगांव चिपटेवाडी वेत्ये रस्त्याचे कामाचे अशोक दळवी यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातून माजगांव चिपटेवाडी वेत्ये रस्ता (शेलटीचे गाळव) डांबरीकरण करणे, तसेच संरक्षण भिंत बांधणे, यासाठी बजेटमधून सन २०२३-२४ रु.२०.०० लक्ष निधी उपलब्ध करण्यात आला. सदर कामाचे भुमीपुजनाचे उदघाटन श्री. अशोक दळवी, माजी सभापती, सावंतवाडी पंचायत समिती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले.

यावेळी माजगांव ग्रामपंचायत उपसरपंच रिचर्ड डिमेलो, ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ज्ञानु सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुधीर वारंग, राजू सावंत, एकनाथ हळदणकर, ठेकेदार राज आआंबेकर, श्री. सुशिल कोकुळकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page