Uncategorized
आचिर्णे धनगरवाडी येथील स्ट्रीट लाईट साठी ७ लाखांचा निधी मंजूर…
वैभववाडी (प्रतिनिधी )मा.पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून व सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मा. श्री. दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून आचिर्णे धनगरवाडी येथे स्ट्रीट लाईट(सौर ऊर्जा) कामासाठी रुपये ७ लाख निधी मंजुर करण्यात आला या कामाचे उद्घाटन मा.सरपंच वासुदेव रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थित सिध्देश रावराणे, सुनिल रावराणे,उत्तम सुतार, गंगाराम गुरखे,सखाराम झोरे,दत्ताराम गुरखे ,जनार्दन शिंगाडे,…
कुभवठे येथील आरोग्य शिबीरात ६० पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ…
वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील कुभवठे ग्रामपंचायत येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीर ६० पैक्ष अधिक रुग्णाने शिबिराचा लाभ घेतलावैभववाडीतालुक्यात श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने कुभवडे गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात 60 पेक्षा अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला असून…
गुढी पाडव्यापासून प्रवक्ते म्हणून केसरकर सांभाळणार शिवसेना पक्षाची नवी जबाबदारी…
आंबोली, ता.२७: काजू पल्प बनवणारे यंत्र दोन दिवसात शुभारंभ करण्यात येईल.सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये ३२०० कोटी चा काजू फुकट खराब होत असल्याबाबत ब्राझील मध्ये शिष्ट मंडळ पाठवून त्यावर उपाययोजना अंमलात आणणार आहे.हत्ती संदर्भात कर्नाटक येथे शिष्टमंडळ पाहणी साठी पाठवले आहे.वन मंत्री सोबत बैठक घेऊन निर्णय होईल. शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी पुन्हा गुढी पाडव्यापासून आपण सांभाळणार आहोत….
कुडाळ नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ…
सभाशास्त्र धाब्यावर ; वैयक्तिक टीका टिपणीवरच भर.. कुडाळ : कुडाळ शहराचा विकास करायचा आहे. आम्ही कुडाळ नगर पंचायतीचे विश्वस्त आहेत. विकासाच्या कोणत्या गोष्टीला आमचा विरोध नाही, पण चुकीच्या गोष्टी आम्ही होऊ देणार नाही. असा सूर आज झालेल्या कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्व साधारण सभेत सगळ्याच नगरसेवकांकडून आळवला गेला. पण सर्व नगरसेवकांची हीच भूमिका असून…
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात…
⚡ओरोस ता.२७-: सिंधुदुर्गनगरी येथे आज पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे लक्ष सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधा, याठिकाणी अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा, अमृत भारत योजना आदी विषयांकडे वेधले. पालकमंत्री श्री.राणे…
पालकमंत्र्यांचा पहिलाच जनता दरबार हाऊसफुल…
शेकडोंनी नागरिक निवेदने घेवून दाखल.. ओरोस ता २७पालकमंत्री नितेश राणे यांनी आयोजित केलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांची जत्रा फुलली होती. जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल झाला. त्यामुळे पालकमंत्री कक्षात सुरू केलेला हा कार्यक्रम हलवून जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात घेण्यात आला.जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर मंत्री राणे यांनी जनेतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातून…
अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आंबोली येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ची पाहणी…
आंबोली,ता.२७: वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ची पाहणी अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज केली. तसेच सर्वे क्रमांक २१६ प्लॉट मध्ये नांगरतास मध्ये ही स्थळ पाहणी उस संशोधन संदर्भात केली.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,आमदार दीपक केसरकर , उपस्थित होते.त्यांची बैठक उस संशोधन केंद्रात झाली. यावेळी पत्रकारांशी फक्त आपण याठिकाणी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर याठिकाणी भेट देऊन पाहणी…
बांदा शिमगोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा…
⚡बांदा ता.२७-: होळी पौर्णिमेपासुन पंधरा दिवसांनी साजरा होणारा बांदा येथिल शिमगोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत सप्तरंगांची उधळण केली.शिमगोत्सवानिमित्त आदल्या दिवशी बुधवारी गांधीचौक मित्रमंडळ व मांडकरी प्रासादिक नाट्यमंडळ, बांदा निर्मित ‘एकदा पहाव करून’ हा स्थानिक कलाकारांचा दोन अंकी धमाल म्युझिकल विनोदी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. गुरुवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील…
एमएचटी-सीईटी क्रॅश कोर्सला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद”…
⚡कणकवली ता.२७-: एसएसपीएमच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीच्या एमएचटी-सीईटी क्रॅश कोर्सला संपूर्ण प्रदेशातील विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांना अत्यंत स्पर्धात्मक महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षेची (एमएचटी-सीईटी) तयारी करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेल्या या क्रॅश कोर्सने मोठ्या संख्येने इच्छुक अभियंत्यांना आकर्षित केले आहे. १८ मार्च २०२५ रोजी सुरू झालेल्या या क्रॅश कोर्समध्ये एमएचटी-सीईटी अभ्यासक्रमाचे सर्व…
