धाडसी कार्याबद्दल मालवणच्या सुकन्या सौ. प्रियांका भोगावकर – पाटील यांचा रेल्वे पोलीस विभागाकडून सन्मान…!
⚡मालवण ता.०२-:धावत्या रेल्वेतून ६ महिन्याच्या मुलासह फलाटावर उडी मारणाऱ्या महिलेला वाचविणाऱ्या मालवण कुंभारमाठच्या सुकन्या आणि दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शिपाई सौ. प्रियांका अविनाश पाटील (पूर्वाश्रमीच्या प्रियांका विनोद भोगावकर) यांचा मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सौ. प्रियांका पाटील या दि.१७ मार्च २०२४ रोजी दादर रेल्वे स्टेशनवर पोलीस कर्तव्य बजावत…
