दाणोलीत विजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज ग्राहक हैराण…
⚡सावंतवाडी ता.११-: वाढलेले तापमान, रणरणत्या उन्हात जीवाची लाहीलाही होत असताना दाणोली गावात वीजेचा लपंडाव सुरू असल्याने गावातील वीज ग्राहक प्रचंड नाराज असून लवकरात लवकर विजेचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
