*कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजय

*💫कुडाळ दि.१८-:* मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तालुक्यातील सर्वाधिक ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय संपादन केला आहे.यामध्ये वसोली, कुसबे-पोखरण, आकेरी, गिरगाव-कुसगाव, माङयाचीवाडी या ग्रा.प. वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेना शाखेत शिवसेना पक्षाच्या…

Read More

*जनतेने महाविकास आघाडीला दाखवली जागा

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची महाविकास आघाडीवर टीका* सावंतवाडी-: सावंतवाडी तालुक्यातील जनतेमध्ये असलेला शिवसेनेबाबतचा रोष आज जनतेने दाखवून दिला आहे. तालुक्यातील ११ पैकी ८ ग्रामपंचायत ह्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तालुक्यातील जनतेने महाविकास आघाडीला आपली जागा दाखवून दिली आहे. अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केली आहे….

Read More

वैभववाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व

१३ पैकी ९ ग्रा.पं. भाजपाकडे, ४ सेनेकडे* *💫वैभववाडी दि.१८-:* वैभववाडी तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा राहिला आहे. १३ ग्रा पं पैकी ९ ग्रा.पं. चे निकाल भाजपाच्या बाजूने तर ४ सेनेच्या बाजूने लागले आहेत. तालुक्यातील सांगूळवाडी, आचिर्णे, मांगवली, वेंगसर, एडगाव, नाधवडे, कोकिसरे, ऐणारी, भुईबावडा ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली आहे. तर लोरे , खांबाळे, कुंभवडे , सोनाळी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात भाजपचेच वर्चस्व

*तालुक्यात ११ पैकी ७ ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता* *💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून, ११ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायती भाजपच्या हातात आल्या असून, ३ ग्रामपंचायती सेनेच्या हातात गेल्या आहेत. तर एक ग्रामपंचायत मध्ये सेना आणि भाजपचे पाच – पाच उमदेवार निवडून आले असून, एक अपक्ष उमेदवार निवडून आल्याने या ग्रामपंचायतीवर सत्ता…

Read More

*आंबोली ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व*

*💫सावंतवाडी दि१८-:* आंबोली ग्रामपंचायतीत ११ पैकी ७ उमदेवार भाजपचे विजयी झाले असून, आंबोली ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे.

Read More

*आरोंदा ग्रामपंचायत सेनेकडे

*💫सावंतवाडी दि१८-:* आरोंदा ग्रामपंचायत मध्ये ११ पैकी ६ उमदेवार हे सेनेचे विजयी झाले असून, आरोंदा ग्रामपंचायतीत सेनेचा झेंडा फडकला आहे.

Read More

*चौकुळ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता*

*💫सावंतवाडी दि१८-:* चौकुळ ग्रामपंचायतीवर ११ पैकी ६ उमदेवार भाजपचे विजयी झाले असून, चौकुळ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे.

Read More

*मळेवाड ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता*

*💫सावंतवाडी दि१८-:* मळेवाड ग्रामपंचायत मध्ये ११ पैकी ८ उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. मळेवाड ग्रामपंचायतीवर कमळ फुलले आहे. सेनेकडे असलेली ही ग्रामपंचायत भाजपने खेचून आणली असून, सेनेची ग्रामपंचायत भाजपने काबीज केली आहे.

Read More

*आंबोली प्रभाग दोन मध्ये भाजपचे दोन तर सेनेचा एक उमदेवार विजयी*

*💫सावंतवाडी दि१८-:*आंबोली ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले असून, सेनेचा एक उमदेवार विजयी झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सेनेतून भाजप मध्ये प्रवेश केलेले दत्तू नार्वेकर यांचा विजय झाला आहे.

Read More

*दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ*

*💫सावंतवाडी दि१८-:* दांडेली ग्रामपंचायत ९ पैकी ५ उमदेवार भाजपचे निवडून आले असून, दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे

Read More
You cannot copy content of this page