*जनतेने महाविकास आघाडीला दाखवली जागा

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची महाविकास आघाडीवर टीका*

सावंतवाडी-: सावंतवाडी तालुक्यातील जनतेमध्ये असलेला शिवसेनेबाबतचा रोष आज जनतेने दाखवून दिला आहे. तालुक्यातील ११ पैकी ८ ग्रामपंचायत ह्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तालुक्यातील जनतेने महाविकास आघाडीला आपली जागा दाखवून दिली आहे. अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, ठाकरे सराकरने जो अन्याय जिल्ह्यावर केला आहे. त्याचे परिणाम आज महाविकास आघाडीला बसला आहे. भाजपचे निवडून आलेले सर्व सदस्य गावाच्या विकासाठी कुठे कमी पडणार नसल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहरध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page