सत्यम हॉटेलसमोर साचले पाणी

भराव खचून जात चिखलाचे पाणी घुसले विहिरित;यशवर्धन राणेंची नाराजी *💫कुडाळ दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सत्यम हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, रस्त्याच्या बाजूला घातलेला भराव देखील खचून गेला आहे. तसेच या मातीच्या भरावातून जाणारे चिखलाचे पाणी विहिरीत जात असल्याने विहिरीतील पाणी देखील दूषित झाले आहे. या सर्वाचा…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६६ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ६४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीस वाडा २, तर ग्रामीण भागात आंबोली १, बांदा २, कास १, सातोसे १, शेरले १, आजगाव १, आजगाव भोम २,…

Read More

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम (पी.एच.डी) अध्ययन करण्यसाठी अर्थिक मदत करण्यात येते. या योजनेतर्गत 2021-2022 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 18 जून 2021 पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी केले आहे….

Read More

चर्चा फिस्कटली: आशांचे आंदोलन सुरुच राहणार

शंकर पुजारी यांची माहिती ओरोस-: महाराष्ट्र राज्यात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचा १५ जून पासून राज्यव्यापी संप सुरू आहे. या बाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा होऊनही तडजोड न झाल्याने संप सुरूच राहील असे कृती समितीच्या वतीने शंकर पुजारी यानी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचा १५ जून पासून राज्यव्यापी…

Read More

तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांना मदतीसाठी शासन सकारात्मक

उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई *💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* मच्छिमार बांधवांनी मांडलेल्या सर्व मुद्यांवर शासन सकारात्मक कार्यवाही करेल. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसही शासनाने अनेक नियम बदलून वादळग्रस्तांना मदत केली आहे. त्याचपद्धतीने तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमार यांनाही मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने यावेळी मच्छिमार बांधवांच्या तोक्ते वादळातील झालेल्या नुकसानीबाबत…

Read More

पुणे मेडिकल कॉलेज येथील ४ तज्ञ डॉक्टरांची सिंधुदुर्गात नियुक्ती

खास.राऊतांची मागणी मुख्यमंत्री यांनी केली पूर्ण :आम वैभव नाईक *💫कणकवली दि.१६-:* कोविड साथरोगाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असल्यामुळे साथरोगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी डॉकटर देण्याची मागणी खास.विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार टास्क फोर्स अंतर्गत बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील ४ तज्ञ डॉक्टरांची…

Read More

लसीकरणाला जास्तीत जास्त प्राधान्य द्या

नांदगाव आरोग्य केंद्राला तहसीलदारांची भेट *💫कणकवली दि.१६-:* कणकवली तालुक्यातील नुकतेच २६ गावात कोरोना पाश्र्वभूमीवर वाढती संख्या लक्षात घेता व यात नांदगाव गावाचा समावेश असल्याने दुपारी कणकवली तहसीलदार आर.जे‌.पवार यांनी भेट दिली. यावेळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ पोळ , नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, मंडळ अधिकारी जाधव ,तलाठी अलकुटे नांदगाव आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी…

Read More

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून वगळावे

शिक्षक भारतीची शासनाकडे मागणी *💫कणकवली दि.१६-:* दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन (बोर्ड) कामकाजासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून वगळावे अशी मागणी कणकवलीचे तहसिलदार आर.जे.पवार यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांना संघटनेच्यावतीने दिलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे. कोविड 19 च्या आजाराच्या अनुषंगाने कणकवली तालुक्यातील माध्यमिक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या चेक पोस्ट कोविड सेंटर, प्राथमिक…

Read More

माणगाव येथील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत *💫कणकवली दि.१६-:* कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील तरुणांनी माजी आमदार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन, माजी आमदार जीजी उपरकर यांच्या निर्भीड कामाने भारावून,मनसे पदाधिकारी, व महाराष्ट्र सैनिक यांच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कामांनी प्रभावित…

Read More

बांदा शाळा नं १ च्या मुलांचे ऑनलाईन स्वागत

२०२१-२२ शैक्षणिक वर्ष प्रारंभ निमित्त प्रशालेचा उपक्रम *💫बांदा दि.१६-:* दरवर्षी उन्हाळी सुट्टीनंतर चैतन्यमय वातावरणात १५जूनला मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात येते ,पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा दिवस प्रत्यक्ष शाळेत येऊ साजरा करता येणे अशक्य झाल्याने बांदा नं.१ केंद्रशाळेत या दिवशी नवीन शैक्षणिक सन २०२१-२२या वर्षाच्या आॅनलाईन शुभेच्छा विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्वाधिक…

Read More
You cannot copy content of this page