परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम (पी.एच.डी) अध्ययन करण्यसाठी अर्थिक मदत करण्यात येते. या योजनेतर्गत 2021-2022 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 18 जून 2021 पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राषर्जी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतंर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी साठी जागतीक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज swfs.applications.2122@gmail.com या ई-मेलवर पाठवून त्यांची प्रत मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य , पुणे 411001 या पत्यावर द्यावी . या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च यांचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे आणि पी.एच.डी. साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम.डी.आणि एम.एस.अभ्यासक्रमच प्रवेशसाठी पात्र असतील, वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नसावे.अर्जाचा नमुना व सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार या लिंकरवर भेट द्यावी.असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page