लसीकरणाला जास्तीत जास्त प्राधान्य द्या

नांदगाव आरोग्य केंद्राला तहसीलदारांची भेट

*💫कणकवली दि.१६-:* कणकवली तालुक्यातील नुकतेच २६ गावात कोरोना पाश्र्वभूमीवर वाढती संख्या लक्षात घेता व यात नांदगाव गावाचा समावेश असल्याने दुपारी कणकवली तहसीलदार आर.जे‌.पवार यांनी भेट दिली. यावेळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ पोळ , नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, मंडळ अधिकारी जाधव ,तलाठी अलकुटे नांदगाव आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ वाळके ,बाळा मोरये आदी उपस्थित होते. नांदगाव येथील रुग्ण संख्या कमी होत आहे काही रिपोर्ट येणे बाकी आहे . संशयित रुग्ण असलेल्यांची तपासणी करण्यात यावी तसेच जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे यासाठी वाडीतील समाजसेवक यांच्या मदतीने जे लसीकरणास तयार नाही अशांसाठी व मतप्रर्वतीत करण्यात यावे यासाठी आपली काही मदत लागली तर सांगा अशा सुचनाही यावेळी तहसीलदार यांनी दिली आहे ‌‌

You cannot copy content of this page