संशोधनाचा उपयोग आंबा बागायतदारांना होईल-डॉ.सावंत

💫वेंगुर्ला दि.२२-: मागील ३ वर्षे सातत्याने पावसाचे प्रमाण वाढत असून डिसेंबरपर्यंत पाऊस पडत आहे. त्यामुळे आंब्याला पालवी येऊन मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडते. याबाबत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठामध्ये संशोधन चालू आहे. भविष्यात या संशोधनाचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार असल्याचे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत यांनी केले. फोटोओळी – राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त डॉ.बी.एन.सावंत यांनी मार्गदर्शन…

Read More

वेंगुर्लात नद्या, ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत वाढ;

भातशेती पाण्याखाली 💫वेंगुर्ला दि.२२-: वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारपासून पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. गुरुवारी सकाळपासून सतत पावसाची रिपरिप सुरू असल्याने तालुक्यातील नद्या, ओहोळांच्या पाण्याच्या वाढ झाली आहे. दरम्यान तालुक्यात सर्व जनजीवन सुरळीत होते.

Read More

अनारोजीन लोबो यांनी आमदार नितेश राणे यांच्या नावाचा आधार घेऊ नये

भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा लोबो यांना सल्ल 💫सावंतवाडी दि.२२-: अनारोजीन लोबो यांनी केवळ आपल्या बातमीचा टीआरपी वाढवण्यासाठी आमचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नावाचा आधार घेऊ नये, असा सल्ला भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी लोबो यांना प्रसिद्धी पत्रकातून लगावला. लोबो यांनी आमदार नितेश यांनीच आपल्याला संजू परब यांच्या भानगडी बाहेर काढा, असे…

Read More

खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी

व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 💫कणकवली दि.२२-: गेले पाच ते सहा दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसले असून व्यापारी दुकांनामध्ये तर काहींच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.विजयदुर्ग खाडीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांच्या वस्तीमध्ये असणाऱ्या काही खाजगी तसेच सार्वजनिक पिण्याच्या…

Read More

कणकवलीत पुराचे पाणी कातकरी झोपड्यात घुसले;

संसार गेला वाहून 💫कणकवली दि.२२-: जाणवली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने हे पाणी अचानक कातकरी वस्तीत आले त्यामुळे आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.कणकवली निम्मेवाडी गावळदेव येथे राहत असणाऱ्या कातकरी कुटुंबियांच्या झोपडीत जाणवली नदीचे पाणी घुसले.या कुटूंबाचा धान्य,कपडे,भांडी असा संपूर्ण संसार वाहून गेला.नदीने रौद्ररूप धारण केले त्यावेळी वाड्यावर गरोदर महिला आणि छोटी बालके होती.पुरुष मंडळी…

Read More

कनेडी-नाटळ नरडवे रोडवरील मल्हार पूल कोसळला;

वाहतूक पूर्णपणे ठप्प 💫कणकवली दि२२-: मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील कनेडी-नाटळ नरडवे रोडवरील मल्हार नदीवरील पुलाला तडे जात रस्ता खचला होता आता हा ब्रिजच कोसळला आहे .त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नरडवे , नाटळ, दिगवळे , दारीस्थे या गावांचा संपर्क तुटला आहे. काही दिवसापूर्वी पिलरखालील कॉंक्रीट वाहून सळ्या बाहेर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे…

Read More

खारेपाटण ब्रिज वाहतुकीसाठी बंद

शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे निर्णय 💫खारेपाटण दि.२२-: मुसळधार पावसामुळे खारेपाटणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील ब्रिटिशकालीन पूल दुपारी ३ नंतर प्रशासनाच्यावतीने बंद करण्यात आला आहे. खारेपाटण शुक नदीने रौद्र रूप धारण केले असून पुराच्या पाण्याची पातळी ही वाढत चालली आहे.तर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज…

Read More

वाघोटन नदीने ओलांडली इशारापातळी…

💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-: आज सायंकाळी 4 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली असून खारेपाटण पुलाजवळ या नदीची पातळी 8.900 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. वाघोटन नदीची इशारा पातळी 8.500 मीटर आहे तर धोका पातळी 10.500 मीटर आहे. तर भंगसाळ पुलाजवळ मोजण्यात आलेल्या कर्ली नदीच्या पाणीपातळीनुसार या…

Read More

अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी 💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-: जिल्ह्यामध्ये 25 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सद्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे….

Read More

जिल्ह्यात आज आणखी 163 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 42 हजार 532 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,हजार 197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 163 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More
You cannot copy content of this page