हिमाचलच्या राज्यपालांनी घेतले श्रीवेतोबाचे दर्शन

*💫वेंगुर्ला दि.२५-:* हिमाचल प्रदेश राज्याचे नवनियुक्त राज्यपाल, गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी रविवारी (२६ जुलै) सपत्नीक आरवली वेतोबा मंदिराला भेट देत श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक आरवली वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वेतोबाला केळ्यांचा घड, धोतरजोडा, नारळ अर्पण करत जनतेला निरोगी आयुष्य आरोग्य लाभू दे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १६२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४३ हजार १७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १६२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर शिवसेनेतर्फे विविध उपक्रम

कणकवली 25 जुलै (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 27 जुलै रोजी कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व खासदार विनायक राऊत जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच कणकवली स्वयंभू मंदिर येथे…

Read More

मालवण येथील 100 इडियड्स व्हाट्सॲप ग्रुपचा असाही आदर्श

चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन टेम्पो जीवनावश्यक साहित्य पाठविले *💫मालवण दि.२५-:* गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेऊन मदातकार्यात अग्रेसर असणाऱ्या मालवण येथील 100 इडियड्स या व्हाट्सएप ग्रुपने पुन्हा एकदा आपल्या सेवकार्यातून आदर्श निर्माण केला आहे. चिपळूण येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन टेम्पो भरून जीवनावश्यक साहित्य शनिवारी रात्री रवाना करण्यात आले. चिपळूण येथे निर्माण झालेल्या विध्वंसक पूरस्थिती नंतर अनेकांचे…

Read More

पाळये गावाला जोडणारा पूल पुराच्या पाण्याने गेला वाहून

तात्काळ उपाययोजना करण्याच्या जि. प.सभापती डॉ.अनिषा दळवी सुचना *दोडामार्ग / सुमित दळवी* तिलारी मुख्य रस्त्यापासून पाळये गावाला जोडणारा पूल गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पुराच्या पाण्याने वाहून गेला त्यामुळे गुरुवार रात्रीपासून पाळये गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.गावातून बाहेर येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोडामार्ग तिलारी रस्त्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या पाळये पुलाची…

Read More

रोटरी क्लबतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोविड योद्ध्यांचा सत्कार

प्रोत्साहनपर बळ देण्यासाठी स्व. डॉ. दिवाकर मराठे चॅरीटेबल ट्रस्टचा पुढाकार *💫कणकवली दि२५-:* कणकवली रोटरी क्लब कणकवलीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोविड योध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला . विशेषतः शासकीय यंत्रणेतील डॉक्टर्स , नर्सस व अन्य सामान्य कर्मचारी वर्ग कोविड संदर्भात करत असलेल्या कार्याची नोंद रोटरी क्लब कणकवलीने घेऊन त्यांना प्रोत्साहनपर बळ देण्याच्या उद्देशाने हा…

Read More

मडुरा पुलासाठी उद्या बेमुदत उपोषण

मंजुरी अभावी रखडले मडुरा व सातार्डा मोरीपुल *💫बांदा दि.२५-:* मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर मडुरा पुलाचा काही भाग कोसळून धोकादायक बनले आहे. तर सातार्डा येथे जया पारिपत्ये यांच्या घराजवळ असलेले मोरीपूल कोसळण्याच्या स्थितीत आहे. दोन्ही ठिकाणी जिवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. अद्यापपर्यंत या पुलांच्या बांधकामास मंजुरी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि२५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 13 हजार 692 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 387.6290 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 86.65 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 55 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 62.2110, अरुणा…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 64 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि२५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 64 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 32.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2634.263 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 28(2543), सावंतवाडी – 49(2831.10),…

Read More

बांद्यात मुसळधार पावसात गोठा कोसळून हानी

एक म्हैस ठार झाली तर दोन म्हैशी पुराच्या पाण्यात वाहिल्या *💫बांदा दि.२५-:* बांदा मुस्लिमवाडी येथे तेरेखोल नदी किनाऱ्यालगत असलेला दाऊद आगा यांचा गोठा मुसळधार पावसात कोसळल्याने 1 म्हैस ठार झाली तर २ म्हैशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आगा यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बांदा शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे….

Read More
You cannot copy content of this page