महावितरण कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

आज मिळणार थकीत वेतन;अधीक्षक अभियंता चव्हाण यांची ग्वाही *⚡कुडाळ ता.१८-:* पगार न झाल्याने निराश झालेल्या महावितरणच्या जिल्ह्यातील आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ चा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल महावितरणने घेतली असून येत्या दोन दिवसात आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील अशी ग्वाही महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली यांनी दिली. आज महावितरणचे आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी यांच्याशी…

Read More

मोचेमाड येथे जाळ्यात सापडलेल्या डॉल्फिन माशांना जीवदान

*⚡वेंगुर्ले ता.१८-:* मोचेमाड समुद्रात पारंपारिक मासेमारी पद्धतीने करण्यात येत असलेल्या रापण या मासेमारी प्रकारातील जाळ्यात आज १८ नोव्हेंबर रोजी तीन मोठे डॉल्फिन मासे सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी या डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले. रापणीच्या जाळ्यात सापडलेल्या या डॉल्फिन माश्यांना पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती. मोचेमाड…

Read More

सिंधुदुर्ग जि. प.मध्ये झालेल्या भ्रष्टाचारांची तपासणी व्हावी

डॉ.संजय रायमुलकर यांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली मागणी *⚡कणकवली ता.१८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत भेट घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांचे लक्ष वेधले. पंचायत राज समिती 30 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

सावंतवाडीत २७ रोजी मोफत हृदयरोग, मुतखडा शस्त्रक्रिया शिबीर

*⚡सावंतवाडी ता.१८-:* जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी यांच्यावतीने व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयविकार व दुर्बीणद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबिराचे आयोजन २७ नोव्हेंबर रोजी काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी ( प्रांत कार्याल्यासमोर) येथे करण्यात आले आहे. हृदविकाराच खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात. १) हृदयरोग व मधुमेह* *२) छातीत धडधडणे* *३)…

Read More

आगी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्वाचा उपाय

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-:* आगी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी कामाच्या ठिकाणी सतर्क रहावे. दुर्दैवाने एखाद्या ठिकाणी आग लागण्याचा प्रकार घडल्यास उपस्थित असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांनी प्रथम माहिती देणे व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी यांना अग्मी शमन यंत्रणा हाताळण्याची माहिती असणे आवश्यक आहे. अशी माहिती…

Read More

कणकवली शहरातील चिमुकल्यांसाठी आयोजित 20 नोव्हेंबरचा कार्यक्रम रद्द

लवकरच कार्यक्रमाची रूपरेषा व तारीख जाहीर करणार:बंडू हर्णे *⚡कणकवली ता.१८-:* कणकवली शहरातील चिमुकल्यांसाठी 20 नोव्हेंबर रोजी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेला किलबिल जल्लोष हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्रींचे गुरुवारी निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. दरम्यान पुन्हा लवकरच…

Read More

सोनुर्ली जत्रोत्सवात मास्कचा वापर अनिवार्य

देवस्थान समितीचे भाविकांना आवाहन *⚡सावंतवाडी ता.१८-:* दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ख्याती असलेला श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव २० नोव्हेंबर रोजी होत आहे. गतवर्षी कोरनाच्या पार्श्वभूमीवर हा जत्रोत्सव झाला नसल्याने यंदा दोन वर्षांनी होणाऱ्या जत्रोत्सव भक्तांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, या जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Read More

मळगाव रवळनाथ जत्रोत्सव आज

*⚡सावंतवाडी ता.१८-:* मळगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव आज १८ नोव्हेंबर रोजी होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होणार आहेत. रात्री पालखी परिक्रमेनंतर स्थानिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त ‘श्री’ना विविध वस्त्रालंकारांनी सजविण्यात आले आहे. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे….

Read More

नाटळ व हरकुळ बुद्रुक जि. प.मतदार संघावर भगवा फडकवूया

कनेडी बाजारपेठ येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१८-:* बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नाटळ व हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघावर भगवा फडकवूया आणि विरोधकांची मक्तेदारी मोडीत काढून पुढील वर्षीच्या स्मृतिदिनाला २ जिल्हा परिषद सदस्य व ४ पंचायत समिती सदस्य स्टेजवर दिसतील या पद्धतीने कामाला लागूया आणि ज्यांची कोणाची मक्तेदारी आहे त्यांची मोडीत…

Read More

कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक

*⚡कणकवली ता.१८-:* कणकवली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे (वय ८०) यांचे गुरुवारी सकाळी ९ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कणकवलीच्या नगरसेवका…

Read More
You cannot copy content of this page