सिंधुदुर्गसाठी राज्याचा अर्थसंकल्प “अर्थहीन”

भाजप आ नितेश राणेंची सडकून टीका ओरोस-:राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणाला नेमके काय मिळाले ? असा खडा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. अर्थसंकल्पाचे गोडवे गाणाऱ्या कोकणातील नेत्यांना खरेच अर्थसंकल्प कळाला काय ?असा सवाल करतानाच हा अर्थहीन अर्थसंकल्प असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. आ नितेश राणे यांनी पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये पत्रकार परिषद…

Read More

मडुऱ्यात गव्यांनी केले रब्बी पिकांचे नुकसान

वनविभागाच्या गलथान कारभाराबद्दल शेतकऱ्यांकडून नाराजी *⚡बांदा दि.१०-: मडुरा – परबवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा अक्षरशः हैदोस सुरु आहे. मिरची, नाचणी, भूईमुग, चवळी या रब्बी पिकांसह वायंगणी भातशेतीचेही अतोनात नुकसान करण्यात आले आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी अरुण परब यांनी केली आहे. मडुरा गावात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते….

Read More

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कवी संमेलनाचे आयोजन …

केशवसुत यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आयोजन; निमंत्रित कवी होणार सहभागी… सावंतवाडी ता.१२-:* सामाजिक बांधिलकीच्या वतीने कविवर्य केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त निमंत्रित कवींचे “कवी संमेलन” ता 15 मंगळवार सायंकाळी 6 वा आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन सामाजिक बांधिलकीच्या वतीने करण्यात आले आहे

Read More

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा

भाजपचे युवा नेते विशाल परब : 16 रोजी प्रकाशझोतात आयोजन कुडाळ ता.१२-:* भाजप राज्य प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त विशाल परब मित्रमंडळ आणि कुडाळ भाजपच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता भव्य अशा प्रकाश झोतातील मॅट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन निलेश राणे…

Read More

शहरात भाजपचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे…

बंटी पुरोहित व आनंद नेवगी यांची जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे मागणी; तेलींचा सकारात्मक प्रतिसाद… सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी शहरात भाजपचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे यासाठी आज भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बंटी पुरोहित व माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे लक्ष वेधले असून, यावेळी राजन तेली यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी येत्या…

Read More

नांदगाव केंद्रशाळेत जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

कणकवली ता.१२-:* जागतिक महिला दिन जि. प. केंद्र शाळा नांदगाव नंबर १ येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला आहे.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच आफ्रोजा नावळेकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या प्राथमिक आरोग्यकेंद्र नांदगावच्या डॉ. वाळके , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रणाली बिडये, उपाध्यक्षा रंजना वाळके, केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, ग्रामपंचायत सदस्या ईशा बिडये होत्या. प्रास्ताविक शाळेचे उच्च…

Read More

पुरस्कार प्राप्त अभिमन्यू लोंढे यांचा भाजपतर्फे विशेष सत्कार

सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना एजेएफसी राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मुर्ती राज्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाजप तालुक्याच्या वतीने त्यांना श्रीफळ शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. भाजप कार्यकारणीची बैठक आज सावंतवाडी काजी शहाबुद्दिन हॉल येथे संपन्न झाली यावेळी त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Read More

आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करण्यासाठी ६ लाख ६३ हजार रु निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन मालवण ता.१२-:* आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषद हद्दीतील आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करणे व बैठक व्यवस्था करण्यासाठी ६ लाख ६३ हजार रु निधी मंजूर करण्यात आला आहे.काल या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आ. वैभव नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे…

Read More

अर्थसंकल्पात राज्यातील भूविकास बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी

भूविकास बँक कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार कणकवली ता.१२-:* राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभ, व शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा काल जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी १० वर्षे प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लावला आहे. कुडाळ मालवणचे…

Read More

सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित संघटना अधिकाऱ्यांतर्फे १४ रोजी सतरंजी बैठक आंदोलन

कणकवली ता.१२-:* सामाजिक न्याय विभाग,राजपत्रित अधिकारी संघटना महाराष्ट्र् राज्य पुणे या संघटनेच्या वतीने राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १४ मार्च २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभाग कार्यालयात राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वतीने आगळ वेगळं असं “सतरंजी बैठक आंदोलन” आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभाग राजपत्रित संघटनेचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक…

Read More
You cannot copy content of this page