Headlines

गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज…

वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन:अवजड वाहनांना प्रवेशबंदी ; पर्यायी मार्गाने डंपर वाहतूक.. ⚡कुडाळ ता.२८-: गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गणेश विसर्जन, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ नगरपंचायतीने व्यापक नियोजन केले आहे. नगराध्यक्ष प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या समन्वय बैठकीत विविध विभागांच्या सहकार्याने गणेशोत्सव कालावधीतील उपाययोजनांबाबत महत्त्वाचे…

Read More

कुडाळमध्ये १ सप्टेंबरला रंगणार रानभाज्यांचा महोत्सव..

प.स. तर्फे रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन:विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे.. ⚡कुडाळ ता.२८-: कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, प्रचार-प्रसार तसेच त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे रानभाजी प्रदर्शन, पाककृती स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश…

Read More

राखीच्या धाग्यातून जुळले आपुलकीचे ऋणानुबंध…

युवा नेते विशाल परब यांच्याकडून भगिनींसाठी स्नेहमय रक्षाबंधन सोहळा:माजगाव नाका येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात भावनिक कौटुंबिक वातावरण.. ⚡सावंतवाडी,ता. २८-: रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखीच्या धाग्यातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा प्रत्यय सावंतवाडीत आला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भगिनींशी असलेला स्नेह आणि विश्वासाचा ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी भाजपचे राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वतीने माजगाव नाका…

Read More

उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांच्यामार्फत मोचेमाड येथे शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्लाजि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड येथे सन 2025-26 या वर्षातील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयात नैपुण्य मिळवले, त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जि. प. सदस्य संजय गावडे यांनी विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्याच बरोबर मराठी शाळांमध्ये विध्यार्थ्यांना ओढ निर्माण होऊन मराठी शाळा टिकण्यासाठी सात्यत्याने प्रयत्न करणार असे प्रतिपादन करुन…

Read More

सावंतवाडी पोलीस निरीक्षक मगदूम यांचे महिला शिवसेनेतर्फे स्वागत…

रक्षाबंधनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या.. ⚡सावंतवाडी, ता. २८ -: सावंतवाडी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांचे सावंतवाडी शहर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पोलीस निरीक्षक मगदूम यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलीस आणि समाज…

Read More

शहरातील खड्डेमय रस्ते, तुंबलेल्या गटारांवरून शिवसेना आक्रमक..

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती व गटारे साफ करा: नगरपरिषदेकडे मागणी, भारती मोरे यांनी निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील विविध भागांतील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि गटारांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गणेशोत्सवापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत महिलाशर अध्यक्ष भारती मोरे यांनी निवेदन केले सादर. शहरातील…

Read More

सावंतवाडीत रविवारी राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकरचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीर…

⚡सावंतवाडी ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळ खेळाडू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीर घेण्यात येईल. पुढील कालावधीत होणा-या विदयार्थ्यांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ निवड…

Read More

शिवसेना महिला आघाडीतर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२८-: शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत यांच्यासह नगरसेविका शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, सुप्रिता धारणकर, भारती परब, शिवानी पाटकर, संध्या पाटणकर, पूजा नाईक, राजश्री निर्गुण, नीलम कुमठेकर, अर्चना ब्रोद्रे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.यावेळी शिवसेना…

Read More

गणेश चतुर्थीपूर्वी आंबा-काजू नुकसानभरपाई द्या..

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे मागणी.. ⚡बांदा ता.२८-:आंबा-काजू बागायतींचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची नुकसानभरपाई गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत भरपाई वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी…

Read More

मोटारसायकल चोरीतील संशयित गोव्यात जेरबंद..

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात.. ⚡ओरोस, ता. २९-: वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यात सापळा रचून ताब्यात घेतले. धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेश नगर, कोलवले, गोवा) असे त्याचे नाव आहे.वेंगुर्ला पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये मोटारसायकल चोरीचा…

Read More
You cannot copy content of this page