Headlines

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन…

⚡मालवण, ता.०६-: महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, बाळू नाटेकर, अल्पेश निकम, राजेश पाडावे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Read More

राजन गांवकर अध्यक्ष, कृष्णा ढोलम उपाध्यक्ष

मालवण खरेदी विक्री संघ पदाधिकारी निवडी जाहीर मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी राजन गावकर तर उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. शेतकरी, सभासद यासह ग्राहकांना दर्जेदार सुविधा देताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार केला जाईल असे प्रतिपादन राजन गावकर, कृष्णा ढोलम यांनी व्यक्त केले. मालवण तालुका सहकारी खरेदी…

Read More

मालवणात शिवसेना ठाकरे गटाकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन

⚡मालवण ता.०६-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवण शहरात ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने बांगीवाडा समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, दीपा शिंदे, नरेश हुले, सन्मेष परब यांच्यासह अन्य…

Read More

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे नियमन आदेश लागू

सौरभ कुमार अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या दरम्यान कोणताही अनूचित प्रकार,घटना न घडता निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी.समाजामध्ये सामाजिक शांतता व परस्पर सामंजस्याची भावना वाढीस लागून सामाजिक एकात्मता अबाधित रहावी, यासाठी दिनांक ६ ते २० डिसेंबर २०२२ या* *कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे नियमन…

Read More

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 8 ते 10 डिसेंबर कालावधीत

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन दि.8 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनरी येथे करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि विभागीय व राज्यस्तर स्पर्धांच्या व्यस्ततेमूळे स्पर्धेचे ठिकाण व स्पर्धा कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. ही स्पर्धा दि. 8 डिसेंबर 2022 (सर्व गट मुली व 14 वर्ष मुले) दि.9 डिसेंबर 2022…

Read More

सिंधुदुर्गातील १२ ज्युदोपट्टूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ज्युनिअर निवड चाचणीत कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 ज्युदोपट्टूची निवड झाली आहे. या जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी जिल्हाभरातून 50पेक्षा अधिक ज्युदोपट्टूंनी हजेरी लावली होती.कोल्हापूर येथे महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आयोजित 49 राज्यस्तरीय स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी घेण्यासाठी राज्य स्तरावर…

Read More

बागायतदार, नर्सरी धारकांनी वेधले मंत्री केसरकर यांचे लक्ष

विविध प्रश्नाबाबत दिले निवेदन ⚡वेंगुर्ला ता.०६-: बागायतदार, नर्सरी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन आपल्या प्रश्नांबाबत त्यांचे लक्ष वेधून निवेदन सादर केले आहे. कोकण विभागातील शेती पंपाची वर्गवारी महावितरणने ‘अॅग्रीकल्चर अदर‘ अशी केली आहे. याबाबत सर्व बागायतदार आणि नर्सरी धारकांची हरकत असून ही वर्गवारी ‘अॅग्रो‘ अशी करावी अशाप्रकारची आग्रही मागणी त्यांनी केली…

Read More

जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक एन पी मठकर निवृत्त

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या उपस्थितीत झाला सत्कार ⚡वेंगुर्ले ता.०६-: जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गचे अधिक्षक एन.पी.मठकर हे नियत वयोमानानुसार ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा जिल्हा व सत्र न्यायालयात सेवानिवृत्तपर सत्कार करण्यात…

Read More

पेट्रोल, डिझेल दर तात्काळ कमी करावेत

काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख यांची केंद्र सरकारकडे मागणी ओरोस ता.०६-: केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर 25 ते 35 टक्के पर्यंत घसरलेले असताना पेट्रोल व डिझेलचे भाव देशात का कमी होत नाहीत ? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे…

Read More

सुरंगपाणी येथे बुधवारी दत्तजन्म सोहळा

⚡वेंगुर्ला ता.०६-: खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या धार्मिक स्थळावर ३० नोव्हेंबरपासून दत्तजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, बुधवारी दत्तजन्म सोहळा हा मुख्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त बुधवारी सकाळी श्रींची पाद्यपूजा, गुरुचरित्र सप्ताह पठण व दत्तनामस्मरण, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व नैवेद्य, सायंकाळी ६ वाजता दत्तजन्मसमयी पुष्पवृष्टी, पालखी प्रदक्षिणा, भिक्षादान, आरती, सायंकाळी ७ वाजता…

Read More
You cannot copy content of this page