जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 8 ते 10 डिसेंबर कालावधीत

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन दि.8 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनरी येथे करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि विभागीय व राज्यस्तर स्पर्धांच्या व्यस्ततेमूळे स्पर्धेचे ठिकाण व स्पर्धा कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. ही स्पर्धा दि. 8 डिसेंबर 2022 (सर्व गट मुली व 14 वर्ष मुले) दि.9 डिसेंबर 2022 रोजी 17 व 19 वर्षे मुले) जय गणेश इंग्लिश मेडीयम स्कुल, मालवण येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा* *अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन 2022-23 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page