⚡मालवण ता.०६-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवण शहरात ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने बांगीवाडा समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, दीपा शिंदे, नरेश हुले, सन्मेष परब यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
