⚡मालवण, ता.०६-: महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, बाळू नाटेकर, अल्पेश निकम, राजेश पाडावे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पालिका कर्मचारी उपस्थित होते.
