⚡मालवण ता.०६-: हडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी ठाकरे गट शिवसेना पुरस्कृत प्राची प्रशांत मयेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अरुण दुधवडकर, जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, श्वेता सावंत, दीपा शिंदे, सेजल परब यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
