महान मध्ये ठाकरे गटाला धक्का…

शिंदे दांपत्य भाजपात ; अशोक सावंतांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत…

⚡मालवण ता.०६-: महान ग्रामपंचायतीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी ग्रामपंचायत सदस्य हिमाली शिंदे व शाखाप्रमुख हेमंत शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून आपण पक्षाचा त्याग करत असल्याचे शिंदे दांपत्याने स्पष्ट केले. आता भाजपाच्या शाश्वत विकासाच्या रथाचे सारथी बनून महान गावातील ग्रामस्थांची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर, सुधीर साळसकर, सुदेश आचरेकर, बबलू राऊत, संतोष घाडी, मदन घाडी, अक्षय तावडे, सुहास साळुंखे, मंगेश साळसकर, दिनेश घाडी, अवधूत जाधव, नीता चव्हाण, संदीप शिंदे, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page