जिल्हा जलतरण व योगासन स्पर्धेत
कणकवलीच्या विद्यार्थ्यांची
चमकदार कामगिरी

⚡कणकवली ता.०६-: क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा ही ओरोस येथील शासकीय जलतरण तलाव येथे व योगासन स्पर्धा कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विदयालय येथे नुकताच पार पडल्या.
जलतरण या प्रकारामध्ये १४ वर्ष मुली या वयोगटात कुमारी. काव्या मुक्तानंद गवंडळकर (पोदार – इंटरनॅशनल स्कूल, कणकवली) हिने ५० मी. बँक स्ट्रोक मध्ये (प्रथम क्रमांक), ५०मी व १०० मी फ्री स्टाईल (प्रथम क्रमांक पटकावला. तर कुमारी अनुष्का अभिजीत आपटे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली) हिने ५० मी फ्री स्टाईल द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षे मुले या वयोवगटात कुमार. आर्य समीर नवरे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली) ५० मी बॅक स्ट्रोक (तृतीय क्रमांक) व १०० मी. फ्रि स्टाईल मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. १९ वर्ष मुले या वयोगटात कुमार. मयुर हुले (कणकवली कॉलेज कणकवली) ५० मी. फ्री स्टाईल (द्वितीय क्रमांक) पटकावला. कुमारी तन्वी सचिन दिघे हिने ५०मी, १००मी व २००मी ब्रेस्ट स्ट्रोक (प्रथम क्रमांक) व सृष्टी पंकज दिघे हिने ५०मी ब्रेस्ट स्ट्रोक (द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कुमार अमोघ दत्तात्रय करांडे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली) कुमार. आरुष प्रदीपकुमार शेट्टी (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली) यांनी उत्कृष्टरित्या स्पर्धा पूर्ण केल्या. यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून यांना सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण प्रशिक्षक श्री. प्रविण सुलोकार ( ओरोस) यांचे प्रशिक्षण लाभले. निलम कंट्रीसाईड कणकवली व तेथील मॅनेजर श्री. प्रसाद भट यांनी जलतरण तलाव सरावाकरीता उपलब्ध करुन दिले. व विजयी स्पार्धकांना गौरविले.

योगासन या स्पर्धेमध्ये १४ वर्ष मुली या वयोगटात कुमारी. काव्या मुक्तानंद गवंडळकर (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली) हिने (द्वितीय क्रमांक), कुमारी. अनुष्का अभिजीत आपटे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली) १४ वर्ष मुले या वयोगटातून चतुर्थ क्रमांक कु. आयुष अवधुत बागवे, (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे) व पंचम क्रमांक कु. किसन मनोज देसाई (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे) यांनी पटकावून शालेय विद्यार्थ्यांमध्ये योगा या प्रकाराबद्दल एक नवीन उत्साह व जागृकता निर्माण केली. शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यास संभाळून आरोग्याबाबत कसे जागृक राहता येईल याचे उत्तमरित्या प्रदर्शन दाखविले. या सर्व विद्यार्थ्यांना योगचे प्रशिक्षण हे केंद्र शासन प्रमाणित योगा मूल्यांकनकर्ता व महिला पंतजलि योग समितीच्या युवा व सोशल मिडिया प्रभारी व प्रशिक्षक सौ. श्वेता पळसुले – गावडे यांनी प्रशिक्षण दिले. गेल्या अनेक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली येथे वृंदावन हॉल व निलम कंट्रीसाईड येथे या प्रशिक्षकांचे योग व जलतरण वर्ग सुरु आहेत. सिंधुदुर्ग जिल्हावासियांना नवनवीन प्रशिक्षण मिळावे यांची धडपड या प्रशिक्षकांची सतत सुरु असते. मागील वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीनंतर योगा, जलयोगा, अॅक्वा झुबां व जलतरण या प्रकारासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी धाव घेतली यातीलच मुलांना पुढील प्रशिक्षण देऊन ही मुले राज्य पातळीवर देखील खेळविली. विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत असून यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page