गेळे गावच्या आकारफोड पत्रकाला मान्यता…

संदीप गावडे : प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबत मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.१४-: गेळे येथील जमीन वाटपा संदर्भात गतवर्षी २६ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय झाल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला गती देत केवळ एका वर्षात हा प्रश्न मार्गी लावला. गेळे येथील जमिनीच्या आकारपोड पत्रकाला मान्यता मिळाली आहे. सातबारा वाटपाचे काम देखील सुरू करण्यात येणार…

Read More

बांदा येथे कार्यालयात घुसत मोबाईल, दस्तऐवज चोरल्याचा प्रकार…

तीन इसमांवर गुन्हा दाखल.. बांदा/प्रतिनिधीमुंबई गोवा महामार्गावर बांदा डोंगरआळी येथे तीन बुरखाधारी इसमानी आपल्या कार्यालयात घुसून धक्काबुक्की करत कार्यालयातील दस्तऐवज व आपला मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार सचिन बाळकृष्ण गवस (मुळ रा. झोळंबे, सध्या रा. बांदा) यांनी बांदा पोलिसात दिली आहे. तक्रारीनुसार बांदा पोलिसात तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशानेच ही घटना…

Read More

उभादांडा हायस्कूल वाटेचा वाद पोहोचला जनता दरबारात…

पालकमंत्र्यांचे प्रत्यक्ष भेट देवून न्याय देण्याचे आश्वासन.. सिंधुदुर्गनगरी ता १४ वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलच्या विद्यार्थ्याची रस्ता नसल्याने गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने तात्काळ रस्ता खुला करावा. अशी मागणी उभादांडा ग्रामस्थांनी आजच्या जनता दरबारात केली. तर याबाबत लक्ष वेधण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहाबाहेर विद्यार्थ्यांसमवेत धरणे आंदोलन केले. सिंधुदुर्गनगरी येथे गेले तीन दिवस पालकमंत्र्यांच्या…

Read More

पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांना पोलीस पदक जाहीर…

ओरोस ता.१४-:७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पदक विजेत्या यादीत सिंधुदुर्ग पोलीस दलातील राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांचा समावेश आहे. यामुळे पालशेतकर यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

जिल्ह्यातील २२ पोलिसांना पदोन्नती…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधीक्षकांचे गिफ्ट.. ओरोस ता.१४-:७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील २२ पोलीस कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिले आहे. १५ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर ते ७ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर बढती दिली आहे.

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा…

कणकवलीत फटाके फोडून आनंदोत्सव केला साजरा.. ⚡कणकवली ता.१४-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली. मात्र सदर योजनेचे अनुदान मिळणार की नाही ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने चा पहिला हप्ता जमा झाला. आणि भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील छत्रपती शिवाजी…

Read More

ताज प्रकल्पाला विरोध नाही,मात्र, स्थानिकांना बेघर करून कोणताही प्रकल्प होऊ नये…

राजन तेली:स्थानिकांशी चर्चा करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार.. ⚡सावंतवाडी ता.१४-:शिरोडा वेळागर येथे होत असलेल्या ताज प्रकल्पाला आमचा कोणताही विरोध नाही. जिल्ह्यात असे पर्यटन प्रकल्प यायलाच हवेत अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, स्थानिकांना बेघर करून कोणताही प्रकल्प होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे, भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन…

Read More

पुन्हा २५ सप्टेंबर पासून जनता दरबार…

नागरिकांच्या प्रतिसादामुळे पालकमंत्री चव्हाण यांचा निर्णय:सावंतवाडी जनता दरबारात ३०१ अर्ज.. ओरोस ता.१४-: जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या जनता दरबारात एकूण ११४७ प्रश्न आले. त्यातील ५२१ प्रश्न जागीच सोडविले गेले. शिल्लक राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला टाईम बाँड देण्यात आला आहे. त्यामुळे याचा रिव्हू घेण्यासाठी २५ ते २७ सप्टेंबर…

Read More

सैनिकांमुळेच देश सुरक्षित…

सहदेव सावंत:भारत पाकिस्तान विभाजन विभूषिका स्मृती दिवस फोटो प्रदर्शनाचे आयोजन.. कुडाळ : सैनिकांमुळेच आपला भारत  देश, येथील माणसे सुरक्षित आहेत भारत देशाचे सैन्य विश्वासास पात्र आहेत, त्यांचे देशप्रेम, देशासाठी अर्पित करण्याची त्यांची मानसिकता ही फार मोठी आहे असे प्रतिपादन सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक सहदेव सावंत यांनी भारत-पाक फाळणी स्मृती दिवसाच्या पूर्वसंध्येला 13…

Read More

कुडाळ मध्ये प स. च्या वतीने हर घर तिरंगा रॅली…

देशाच्या जयजयकाराने कुडाळ दुमदुमले.. कुडाळ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हर घर तिरंगा अंतर्गत आज कुडाळ शहरात पंचायत समिती कुडाळच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.  भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणाने परिसर दणाणून गेला. पंचायत समिती कुडाळ येथून हर घर तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली कुडाळ बस स्थानक ते परत पंचायत समिती अशी…

Read More
You cannot copy content of this page