मिलाग्रीस हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात व उत्साहात स्वागत…
⚡सावंतवाडी ता.१६-: मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथील प्रशालेमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोष व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सुरुवातीला रंगीत फुग्यांचे दालन तयार करून शालेय इमारतीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून वर्ग खोल्यांमध्ये शिक्षकांच्या मदतीने बसविण्यात आले. स्वागत समारंभाच्या सुरुवातीलाच प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून नवीन शैक्षणिक…
