Headlines

Global Maharashtra Breaking News

चाकरमान्यांचा स्वागत करण्याचा उपक्रम स्तुत्य…

नागेश चिकणे यांचे प्रतिपादन:कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे रेल्वे स्थानकात चाकरमान्यांचे स्वागत.. ⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुका प्रवास संघ प्रवाशांच्या हितासाठी काम करीत आहे. प्रवाशांच्या प्रश्न व समस्यांबाबत आवाज उठविण्याचे काम प्रवासी संघ करीत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह््यात दाखल होणाºया चाकरमान्यांचे दरवर्षी प्रवासी संघ स्वागत करीत आहे. संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी…

Read Full News

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल…

सावंतवाडी तालुक्यासाठी दोन तालुकाप्रमुख आले नेमण्यात:दिनेश गावडे यांची लागली वर्णी.. ⚡सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले असून सावंतवाडी तालुका प्रमुख पदी युवा नेतृत्व दिनेश गावडे यांची निवड करण्यात आली आहे. हे माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार हे…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांचे संप मागे…

बबन साळगावकर यांची मध्यस्थी: कंत्राटी कामगारांनी मानले साळगावकर यांचे आभार.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या संपाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत प्रांत हेमंत निकम यांनी तोडगा काढला. यानंतर तिनं दिवस सुरू असलेला संप मागे घेण्यात आला. न्याय देण्याचा शब्द मिळाल्याने सावंतवाडी शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी…

Read Full News

भाजप सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२५-: भारतीय जनता पार्टी सावंतवाडी सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र आज आगार प्रमुख यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांकडून आडीवरेकर यांना शुभेच्छा देण्यात आले. आडिवरेकर हे सध्या सावंतवाडी भाजपचे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या कामाच्या कार्याची दखल घेऊन त्यांची आज एसटी कामगार सेनेच्या…

Read Full News

गणेशोत्सव काळात लायन्स क्लब मालवणकडून निर्माल्य संकलन उपक्रम…

⚡मालवण ता.२५-:लायन्स क्लब मालवण तर्फे गणेशोत्सवानिमित्त ‘शाडू माती गणेश मूर्तीपूजन आणि निर्माल्य संकलन’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून मालवण बंदर जेटी येथील गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवून गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण यांनी दिली. याबाबत गणेशभक्तांना आवाहन करणारे पत्रक लायन्स क्लब मालवणच्या बैठकीत…

Read Full News

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप…

⚡सावंतवाडी ता.२५-: गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन. सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संदिप गावकडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ४२ मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष पप्पू परब , जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन गिरप,…

Read Full News

कणकवली तहसील कार्यालयाच्या उपक्रमाची कोकण आयुक्तांकडून दखल…

⚡कणकवली ता.२५-:गावातील मयत व्यक्तीच्या वारसांना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील विविध योजनांचे अनुज्ञेय असलेले लाभमिळण्यास विलंब होतो. यासाठी अशा मयत व्यक्तींच्या वारसांचा शोध घेत त्यांना लाभ देण्याचा उपक्रम कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी राबविला होता. अलिकडेच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कोकण आयुक्तांच्या आढाव्यावेळी या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले होते. आता अशाप्रकारे लाभ देण्याच्या अनुषंगाने…

Read Full News

स्पोर्ट्स फाउंडेशन , कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजन…

⚡कणकवली ता.२४-: राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, कणकवली तालुका पत्रकार संघ आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा सन 2025 आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात आयोजित मॅरेथॉन स्पर्ध‌ेचा शुभारंभ झेंडा दाखवत अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे , पत्रकार संघाचे…

Read Full News

बांदा- दोडामार्ग बंगला अज्ञात चोरट्याने फोडला…!

⚡बांदा ता.२४-: बांदा शहर व परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून आज बांदा दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे भर वस्तीत असलेला देवेंद्र अनंत धामापूरकर यांच्या मालकीचा बंगला अज्ञात चोरट्याने फोडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने चोरीच्या घटनात वाढ होऊ लागल्याने स्थानिकात भीतीचे वातावरण निर्माण…

Read Full News

मटका अड्डा रेड प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्याकडून चौकशी सुरू…!

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात मटका रेड मधील आरोपी आणि काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्याचे समजते. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या रेड नंतर सिंधुदुर्ग पोलीस…

Read Full News

You cannot copy content of this page