Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वच्छता ही सेवा अंतर्गत सुकळवाड भंडारवाडी येथे शोषखड्डे मोहीमेचा शुभारंभ…

⚡मालवण,ता.०१-:‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत सुकळवाड भंडारवाडी येथे महा श्रमदान आयोजित करून आज वैयक्तिक स्तरावर शोषखड्डे (सोकपिट) मारण्याच्या मोहिमेचा शुभारंभ राजन पेडणेकर यांच्या निवासस्थानी श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाताडे, पोलीस पाटील लक्ष्मण काळसेकर यांनी सक्रिय…

Read Full News

शारदोत्सव निमित्ताने जमा शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त विद्यार्थ्यांना…

पीएम श्री बांदा केंद्रशाळेत राबविला अनोखा उपक्रम.. ⚡बांदा ता.०१-: कोकणात दरवर्षी शाळांमध्ये सरस्वती पूजन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, तसेच शाळेच्या भौतिक गरजांसाठी लोकांचे सहकार्य प्राप्त होते.जिल्हा…

Read Full News

भाजप सिंधुदुर्गतर्फे पंधरवडा’ उपक्रमांतर्गत उद्या ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ आयोजन…

⚡बांदा ता.०१-: भारतीयजनता पार्टी, सिंधुदुर्गतर्फे ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ २ ऑक्टोबर रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभर विविध सेवा उपक्रम राबवले जात असून, त्याचा एक भाग म्हणून हे नेत्रतपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र…

Read Full News

शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्वाचा…

विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन.. ⚡बांदा ता.०१-: आपल्या प्रशालेला एक वेगळी परंपरा असुन गेली कित्येक वर्षे क्रीडा क्षेत्रात प्रशालेचे विद्यार्थी नेहमी चमकदार कामगिरी करतात. शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घ्यावी आम्ही संस्था म्हणून तुमच्या पाठीशी राहू असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांनी केले.नुकतीच…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची सावंतवाडीत स्वच्छता रॅली…

⚡सावंतवाडी ता.०१-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सावंतवाडी शहरात रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती केली. उद्या, २ ऑक्टोबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला._ रॅलीची सुरुवात श्रीराम वाचन मंदिरासमोरून झाली. त्यानंतर बाजारपेठेतून फेरी काढत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले….

Read Full News

विद्यापीठ विभागीय बॅडमिंटन स्पर्धत गोगटे-जोगळेकर कॉलेजला अजिंक्यपद…

पुरुष आणि महिला विभागात एसपिके सावंतवाडी कॉलेज उपविजेते.. कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पुरुष आणि महिला विभागाचे अजिंक्यपद मिळविले आहे. एसपिके सावंतवाडी कॉलेजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संत राउळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे मुंबई विद्यापीठाच्या या विभागीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात…

Read Full News

घावनळ्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा खून…

गोठोस येथील २३ वर्षीय युवकाला अटक:५ दिवसांची पोलीस कोठडी.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे येथून २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाला आहे. गोठोस+-मांडशेतवाडी येथील कुणाल कृष्णा कुंभार (वय २३) यानेच वाडोस-बाटमाचा चाळा येथून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन स्थळी गळा आवळून तिचा खून केल्याचे तब्बल दोन महिन्यांनी उघड…

Read Full News

हायवे अधिकऱ्याला मारहाण प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल…

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर झाराप – तिठा येथे मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कार अपघातानंतर ग्रामस्थानी महामार्ग रोखून धरल्याने तेथे आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक (रा.कणकवली) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महामार्गाचे कनिष्ठ अभियंता (राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी…

Read Full News

महिला रुग्णालयात कुडाळ रोटरीतर्फे क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप…

निक्षय मित्र कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ कुडाळचा सामाजिक उपक्रम.. ⚡कुडाळ ता.०१-: रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या विद्यमाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी “निक्षय मित्र” हा महत्वाचा उपक्रम महिला रुग्णालय, कुडाळ येथे राबविण्यात आला. समाजाच्या आरोग्यविषयक जबाबदारीची जाणीव ठेवत रोटरी क्लबने गरजू क्षयरुग्णांना पोषण आहाराचे फूड बास्केट वाटप करून त्यांच्यासाठी…

Read Full News

मनसे आयोजित नवरात्री उत्सवाला पिंगुळीत उत्स्फूर्त प्रतिसाद…

म्युझिकल नाईट गरबा उत्सवाचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०१-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित सिद्धिविनायक मित्र मंडळ पिंगुळी नवरात्री उत्सव येथे म्युझिकल नाईट गरबा शोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या संकल्पनेतून तालुकाध्यक्ष हेमंत जाधव व उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांच्या उत्कृष्ट नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे सिद्धिविनायक मित्र मंडळ…

Read Full News

You cannot copy content of this page