⚡बांदा ता.०१-: भारतीय
जनता पार्टी, सिंधुदुर्गतर्फे ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ २ ऑक्टोबर रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभर विविध सेवा उपक्रम राबवले जात असून, त्याचा एक भाग म्हणून हे नेत्रतपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील नागरिकांना नेत्रविकारांवर मोफत तपासणी, औषधोपचार, चष्मे वाटप आणि शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना या उपक्रमाचा थेट फायदा होणार असल्याची माहिती बांदा भाजप शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिली आहे.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया,औषधोपचार व तज्ज्ञांचे मार्गदर्शन,मोफत चष्मे वाटप मिळणार आहेत
या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आपले डोळ्यांचे आरोग्य तपासून घ्यावे, असे भाजप मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी आवाहन केले आहे.
भाजप सिंधुदुर्गतर्फे पंधरवडा’ उपक्रमांतर्गत उद्या ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ आयोजन…
