⚡मालवण,ता.०१-:
‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत सुकळवाड भंडारवाडी येथे महा श्रमदान आयोजित करून आज वैयक्तिक स्तरावर शोषखड्डे (सोकपिट) मारण्याच्या मोहिमेचा शुभारंभ राजन पेडणेकर यांच्या निवासस्थानी श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाताडे, पोलीस पाटील लक्ष्मण काळसेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी माजी सभापती प्रसाद मोरजकर, माजी उपसरपंच स्वप्निल गावडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. प्रशासनाकडून पंचायत समिती अधिकारी श्री. पळसंबकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी यांनी मोहिमेच्या नियोजनाबाबत माहिती दिली आणि ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.
स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी वैयक्तिक शोषखड्डे बांधणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागून परिसर स्वच्छ राहतो. या श्रमदान मोहिमेत सुकळवाड येथील सर्व ग्रामस्थ आणि कर्मचारी वृंद यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपली कटिबद्धता दर्शवली.
स्वच्छता ही सेवा अंतर्गत सुकळवाड भंडारवाडी येथे शोषखड्डे मोहीमेचा शुभारंभ…
