Headlines

Global Maharashtra Breaking News

अतिक्रमाविरोधात धाकोरे ग्रामस्थ 15 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम…

आश्वासन देऊन कोणतीही हालचाली झाली नसल्याने आता माघार घेणार नाही; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०९-:धाकोरे गावातील होळीचे भाटले – अशोक साटेलकर – रघुनाथ मुळीक घरापर्यंतचा कायदेशीर सार्वजनिक रस्ता ( २३ नंबर) गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे अडथळाग्रस्त आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कृती न झाल्याने, “उपोषण केल्याशिवाय काम का होत नाही?” असा सवाल ग्रामस्थांनी…

Read More

एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेसमधून गोवा बनावटीची दारू जप्त…

कणकवली रेल्वेस्थानक येथे आरपीएफच्या पथकाने केली कारवाई.. कणकवली : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेसमधून २१ हजार रुपयांची गोवा बनावटीसी दारू रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) जप्त केली. ही कारवाई कणकवली रेल्वेस्थानक येथे गुरुवारी दुपारी २ वा. सुमारास करण्यात आली. मात्र, ही चोरटी दारू शवाहतूक करणारा संशयित सापडू शकलेला नाही. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्नाकुलम ओखा…

Read More

कुडाळमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही रॅली शांततेत…

एसटी डेपोजवळ दोन्ही गट एकत्र आल्याने काही काळ तणाव:कुडाळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त,आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीतने कार्यकर्त्यात उत्साह.. कुडाळ : गेल्या वर्षीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला कुडाळ पोलिसांनी दोन्ही गटांच्या रिक्षा रॅलीवर घातलेले निर्बंध. नंतर ते निर्बंध शिथिल केल्यावर आज दोन्ही गटाच्या रिक्षा रॅली वेगवेगळ्या वेगळेत निघाल्या खऱ्या, पण कुडाळ एसटी डेपो जवळ या दोन्ही रॅली एकत्र आल्यावर…

Read More

आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेची रिक्षा रॅली…

⚡कुडाळ ता.०८-: आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत आज कुडाळ मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त शहरातून रिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेने बरोबरच भाजपचे पदाधिकारी सुद्धा उत्साहाने रॅली मध्ये सहभागी झालेले दिसले. आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी कुडाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.नारळी पौर्णिमा उत्सव कुडाळ मध्ये मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आला. रिक्षा…

Read More

कुडाळ मध्ये शिवसेना उबाठा गटाची रिक्षा रॅली उत्साहात…!

कुडाळ : नारळी पौर्णिमा उत्सव कुडाळ मध्ये मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आला. रिक्षा रॅली हे कुडाळचे वैशिट्य असत. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज रिक्षा रॅली काढून माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भांगसाळ नदीला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी कुडाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.गेल्यावर्षी नारळी पौर्णिमेला दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर…

Read More

वेंगुर्ला बंदर येथे नारळी पौर्णिमा उत्साहात…

वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)- वेंगुर्ला येथे आज नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला.

Read More

बांदा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡बांदा ता.०८-: बांदा येथे नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. परंपरेप्रमाणे सायंकाळी श्री बांदेश्वराची पालखी वाजतगाजत देवाचा नारळ घेऊन नदीकडे रवाना झाली. मार्गात श्री विठ्ठल मंदिर व श्री पाटेश्वर मंदिराचे नारळ पालखीत ठेवण्यात आले. नदीवर वार्षिक पारंपारिक पुजा करुन देवांचे नारळ नदीला अर्पण करण्यात आले. त्यानंतर लोकांनी आपले नारळ नदीत टाकले….

Read More

एसटीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू…!

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. कोलगाव नाका येथे ही घटना घडली आहे. मृत दुचाकीस्वार हा माजगाव येथील असल्याचे समजत असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. चेहऱ्यावरून चाक गेल्यानं ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Read More

संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण…!

⚡सावंतवाडी ता.०८-: नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला. शेकडोंच्या उपस्थित हा नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. तदपुर्वी सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून…

Read More

तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिर संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.०८-: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि अखिल भारतीय शिक्षा समागम समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयात विशेष मोहिम अंतर्गत तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिर घेण्यात आले. फोटोओळी-तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिरात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

Read More
You cannot copy content of this page