Headlines

Global Maharashtra Breaking News

सूचना फलक नसल्याने अपघात…

निष्काळजी ठेकेदारावर कारवाई करा: बाबुराव धुरींची मागणी.. ⚡दोडामार्ग ता.१३- :तिलारी–दोडामार्ग मार्गावरील आंबेली येथे रस्त्याचे काम सुरू असताना दुचाकीस्वार थेट खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने एक युवक व एक महिला गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढून उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.घटनास्थळी कोणतेही सूचना फलक किंवा सुरक्षा व्यवस्था…

Read Full News

आंबेली–कोनाळकरवाडी अपघातानंतर ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी…

तात्काळ दुरुस्ती करा: अन्यथा आंदोलन.. ⚡दोडामार्ग ता.१३-: आंबेली–कोनाळकरवाडी परिसरात झालेल्या अपघातानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दोडामार्ग येथील झरेबांबर पंचायत समिती सदस्य स्नेहा संजय गवस यांनी रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे सांगत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.अपघाताची माहिती मिळताच स्नेहा गवस, सरपंच अनिल शेटकर व आपा गवस यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, संबंधित…

Read Full News

काजू बागेत भीषण प्रसंग; मुलाच्या धाडसाने वडील बचावले…

⚡दोडामार्ग ता.१३-: घोटगे गावातील काजू बागेत काम सुरू असताना अचानक सहा हत्तींचा कळप समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. या थरारक प्रसंगात ८० वर्षीय शेतकरी आत्माराम दळवी हत्तीच्या कचाट्यात सापडणार इतक्यात त्यांचे पुत्र भरत दळवी यांनी जीवाची पर्वा न करता वडिलांना उचलून सुरक्षित स्थळी नेले. नशिब बलवत्तर असल्यामुळे दळवी कुटुंब व त्यांच्यासोबत काम करणारे कामगार…

Read Full News

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर…

पी डी शिरसाटअध्यक्ष तर महेश ओटवणेकर सचिव.. ⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची सभा गुरुवारी गुरुवारी येथील महालक्ष्मी हॉल नं. २ मध्ये झाली. या सभेत तालुका व्यापारी संघाची नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. या कार्यकारीणीची निवड करण्यासाठी प्रसाद धडाम यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहीले व सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली.नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष…

Read Full News

झाराप येथे गाव सभेतच ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका…

संजय सामंत यांचे निधन : झाराप भावई मंदिर मधील घटना.. कुडाळ : तालुक्यातील झाराप तिठा येथील संजय विनायक सामंत वय (63) रा. सामंतवाडी या ज्‍येष्‍ठ नागरिक गाव सभेतच कोसळल्याची घटना घडली. उपचाररासाठी सामंत यांना खासगी वाहनातून कुडाळ येथील सिंधू केयर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, मात्र तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.झाराप…

Read Full News

ऍड. नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ चे १९ ला प्रकाशन…

सुरेश प्रभू यांच्या जीवनावर पुस्तकातून टाकलाय प्रकाश:मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार प्रकाशन सोहळा.. कुडाळ : कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभाकर प्रभू म्हणजे सुशासन, धोरण आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगमच. भारताच्या या अत्यंत विद्वान पण तितक्याच साध्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवन प्रवासावर आधारित ऍड. नकुल पार्सेकर यांनी ‘ध्येयधुंद’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गुरुवार दिनांक १९…

Read Full News

मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१३-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात पहाटे ५.३० वाजता मशाल रॅलीने…

Read Full News

बांदा येथे काजू उत्पादकांसाठी ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण शिबीर उत्साहात…

⚡बांदा ता.१३-: सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग व आत्मा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्तम कृषी पद्धतीबाबतचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले. संतोषी माता मंगल कार्यालयात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात काजू उत्पादन वाढ, किड व्यवस्थापन,…

Read Full News

कोल्हापूर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत भोसले पॉलिटेक्निक विजेता….

बी-वन झोन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा भोसले नॉलेज सिटीमध्ये संपन्न…. ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कोल्हापूर विभागीय तंत्रनिकेतन संस्थांकरिता आयोजित बी-वन झोन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य गजानन भोसले…

Read Full News

नेरूर येथे पायलाग लसिकरणाचा शुभारंभ…

जि प सदस्य रुपेश पावसकरव प स सदस्य दीप्ती नाईक यांची उपस्थिती… कुडाळ : केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतीबंधक लसीकरणाची सुरुवात मौजे नेरूर तालुका कुडाळ येथे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य श्रीमती दिप्ती नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सरसोलीधाम येथील गोशाळेतील १४० पशुधनास लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून आज ४८ पशुधनास…

Read Full News

You cannot copy content of this page