Headlines

Global Maharashtra Breaking News

प्राजक्त चव्हाण यांना विधी शाखेची पदवी..

क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेकडून अभिनंदन.. ⚡कुडाळ ता.२८-: क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळचे सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांना मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेची (L.L.B) पदवी प्राप्त झाली.कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज मधून मुंबई विद्यापीठची पदवी प्राप्त केल्याबद्दल क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेच्या मुख्याध्यापिका…

Read Full News

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ न.पं. जलसंधारणासाठी तत्पर…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून बंधारे व जलस्रोतांची पाहणी:‘पाणी अडवा, पाणी वाचवा’चे आवाहन.. ⚡कुडाळ ता.२८-: संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने जलसंधारणाच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २७ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील सूचनांची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी शहरातील उपलब्ध बंधारे आणि अन्य जलस्रोतांची पाहणी केली. यावेळी…

Read Full News

SIR प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फीची मागणी कुडाळ : विशेष सखोल पुनरावृत्ती अर्थात SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी निवेदन देण्यात आले. जिल्हा काँग्रेस…

Read Full News

अतिरिक्त ग्रंथपालांचे वेतन नियमित सुरु करावे

शिक्षण मंत्र्यांकडे मागणी मालवण (प्रतिनिधी) राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल १००० विद्यार्थी संख्येचे निकष अतिशय कमी विद्यार्थी संख्येअभावी संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेले आहे. या अतिरिक्त ग्रंथपाल यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीतून पारित होण्यास अडचण निर्माण होत असून अतिरिक्त ग्रंथपाल यांचे वेतन नियमित सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागाचे अध्यक्ष विलास सोनार…

Read Full News

ई-कचरा जमा करण्याचे आडवली मालडी ग्रामपंचायतीचे आवाहन

मालवण : (प्रतिनिधी) वाढत्या इलेक्ट्रोनिक उपकरणांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातील धातू व रसायनांमुळे माती, पाणी तसेच हवेचे प्रदूषण होऊन मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आडवली मालडी ग्रामपंचायतीने ई-कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ग्रा.पं.च्यावतीने नागरिकांना घरातील जुने मोबाईल, संगणक, मॉनिटर,…

Read Full News

*मत्स्यव्यवसाय विभागाचा पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर बडगा…

लागोपाठ तिसरी मोठी कारवाईरत्नागिरीची ‘इब्राहिम युसूफ’ नौका जप्त; देवगडची मिनी पर्ससीन ‘हरिकृपा-१’ वर कार्यवाही.. ⚡देवगड ता.२८-:तारामुंबरी व कुणकेश्वर परिसरात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाचा कारवाईचा बडगा लागोपाठ सुरू आहे. सोमवारी सकाळी साधारण १० ते ११ वाजता विभागाच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरीची ‘इब्राहिम युसूफ’ (IND-MH-४-MM-५६३५) ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणली, तर देवगडची मिनी पर्ससीन…

Read Full News

गुरुनाथ तिरपणकर यांची मीडिया समन्वयकपदी नियुक्ती

बांदा/प्रतिनिधीमूळ कणकवली येथील व सध्या बदलापूर येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार, ‘आवाज कोकणचा’ या साप्ताहिकाचे उपसंपादक तसेच जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांची राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवं जन कल्याण संघटनच्या ठाणे जिल्हा मीडिया समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तिरपणकर हे मुक्त पत्रकारितेसह विविध वृत्तपत्र समूहांमध्ये पत्रकार व उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जनजागृती…

Read Full News

उघड्या गटारावर स्लॅब बसवा, अन्यथा उपोषण!

वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाला रत्नमोल निकम यांचा इशारा; प्रभाग ९ व १० मधील रहिवाशांचा संताप.. ⚡वैभववाडी ता.२८-: वाभवे वैभववाडी नगरपंचायती हद्दीतील वार्ड क्रमांक ९ आणि १० मधील खुल्या (उघड्या) वहिवाट गटारावर तात्काळ काँक्रीट स्लॅब/झाकणे बसवा अन्यथा सोमवार, दिनांक ०५/१०/२०२६ रोजीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रत्नमोल निकम यांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.दिलेल्या निवेदनात असे…

Read Full News

ई-पिक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवा

पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत; राजाराम सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी नोंदणी अत्यल्प प्रमाणात झाली आहे. तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाची कमतरता तसेच ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या नुकसानभरपाई व विविध कृषी योजनांच्या लाभापासून पात्र शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्याने…

Read Full News

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचा कुडाळात मोर्चा

प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांना विविध मागण्यांचे निवेदन कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज कुडाळ येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली….

Read Full News

You cannot copy content of this page