नेताजी सुभाषचंद बोस यांचे कार्य समाजास दिशादर्शक …

प्रसन्ना देसाई:नगरपरिषद कार्यालय येथे नेताजी सुभाषचंद बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी..

⚡वेंगुर्ला ता.२७-: नेताजी सुभाषचंद बोस यांचे कार्य आजही समाजास दिशादर्शक असेच आहे. त्यांचे आक्रमक नेतृत्व, आक्रमक विचार व शौर्य हे निश्चितच आदर्शवत असेच आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वेंगुर्ला येथे जयंती कार्यक्रमात बोलताना केले.

वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथे आज शुक्रवारी (दि. 23 जानेवारी) नेताजी सुभाषचंद बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नगरसेवक सुधीर पालयेकर, विनय नेरुरकर, सचिन शेट्ये, सदानंद गिरप, नगरसेविका आकांक्षा परब,
सुषमा प्रभुखानोलकर, शीतल आंगचेकर, गौरी माईणकर, रिया केरकर, लीना म्हापणकर, काजल कुबल, प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील, मिळकत व्यवस्थापक रमेश मुन्ने, स्थापत्य अभियंता गणेश कांबळे, लेखापाल अभिषेक पाटील, नगर रचनाकार अक्षय तोरस्कर, माजी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, सागर चौधरी, न. प. अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page